एकनाथ शिंदेंकडून मंत्रिमंडळात बदलांचे संकेत:मंत्र्यांची धाकधूक वाढली! दिवाळीपूर्वी फेरबदल, नव्या चेहऱ्यांना मोठी संधी
राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या हालचालींना सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी निर्णायक पावले उचलण्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य बदलांमुळे सध्या मंत्रिपदावर असलेल्या अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता…