Headlines

राजापूरमध्ये 75 व्यक्तींची कॅन्सर तपासणी‎:डॉ.जयश्री थोरात यांच्या पुढाकारातून कॅन्सर तपासणी

संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांच्या आरोग्य सक्षमीकरता डॉ.जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध गावांमध्ये कॅन्सर तपासणी होत आहे. राजापूर मधील ५१ महिला व २४ पुरुषांनी मोफत कॅन्सर तपासणी केली आहे. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व एकवीरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर येथे महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर झाले. यावेळी कारखाना संचालिका सौ. लतिकाताई गायकर,उपसरपंच…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण:फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात; दानिशच्या मोबाईलमधून संशयास्पद फोटो SIT च्या हाती

नाशिक येथील TCS मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास आता अधिक सखोल झाला असून, यातील मुख्य संशयित आणि सध्या फरार असलेली निदा खान ही अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या सतत संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथकाने केलेल्या तांत्रिक विश्लेषणामध्ये ही बाब निष्पन्न झाली असून, यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य आणि गुंतागुंत अधिकच वाढली आहे….

Read More

मोकाट जनावरांमुळे पाथर्डी बाजारामध्ये नागरिकांना त्रास:शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा करावा लागतोय सामना‎

शहरातील आठवडे बाजार हा नागरिकांसाठी आहे की मोकाट जनावरांसाठी, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. बुधवारी भरलेल्या आठवडे बाजारात मोकाट जनावरांच्या झुंजीत बाजारासाठी आलेल्या महिलेसह तिच्या कडेवर असलेले चिमुकले बाळ गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजारात माणसांपेक्षा मोकाट जनावरांचीच संख्या अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. भाजीपाला…

Read More

पूजेच्या ताटात 2 लिंबांना टाचण्या!:अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; अजित पवारांच्या प्रतिमेजवळील प्रकार

28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, त्यांचे लिअरजेट विमान खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अत्यंत दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा…

Read More

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच उपक्रमशील व्हावे:प्रा. सुनील कल्हापूरे, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीत कॉग्नोत्सव 2026 उत्साहात‎

स्पर्धेच्या युगात आज प्रत्येक अभियांत्रिकी महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासासोबतच विविध अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रमांचा देखील अनुभव घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन फाउंडेशनचे तांत्रिक संचालक प्रा. सुनील कल्हापुरे यांनी केले. वि . या दोन दिवसीय महोत्सवामध्ये टेक केबिसी, युटोपिया (हॅकेथॉन) टेक ट्रेझर हंट, टेक एक्सलरेट, स्क्विड गेम, रणभूमी, रंगमंच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या…

Read More

4 दिवसांत 1.24 लाख लोक केदारनाथला पोहोचले:भैरवनाथाचे दरवाजे उघडले, बद्रीनाथमध्ये आतापर्यंत 37,884 भाविक पोहोचले

केदारनाथ धामचे कपाट उघडताच चारधाम यात्रेने वेग घेतला आहे. धाममध्ये भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. आतापर्यंत सुमारे 1 लाख 24 हजार 782 भाविकांनी बाबा केदारचे दर्शन घेतले आहे, ज्यामुळे यात्रेबद्दलचा उत्साह स्पष्टपणे दिसत आहे. यात्रेकरूंच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी प्रशासनाने व्यापक व्यवस्था केली आहे. दर्शन सुलभ करण्यासाठी टोकन व्यवस्था लागू करण्यात आली आहे, ज्यामुळे भाविकांना जास्त…

Read More

लोडशेडिंग विरोधात 1 मे रोजी बोंबाबोंब:शेतकरी आक्रमक,‎आंदोलनाचा इशारा‎, सकारात्मक मार्ग‎काढण्याचा प्रयत्न‎‎

पंढरपूर उन्हाळ्याच्या तीव्र झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना लोडशेडिंगमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणारे हे लोडशेडिंग तात्काळ बंद न झाल्यास, १ मे रोजी भाळवणी वीज वितरण कार्यालयासमोर सर्व शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र ””बोंबाबोंब आंदोलन”” छेडले जाईल, असा ठाम इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे. भाळवणी व गार्डी सबस्टेशन अंतर्गत…

Read More

श्वेता राय म्हणाली- माझी कथाच या चित्रपटाची ताकद:छोट्या शहरातून हॉलीवूडपर्यंतचा प्रवास, भोपाळमध्ये चित्रीकरण, नवीन प्रतिभेला मोठी संधी

हॉलीवूड आणि बॉलिवूडमधील अंतर कमी करण्याच्या उद्देशाने बनत असलेला चित्रपट ‘फ्रॉम बॉलिवूड टू हॉलीवूड’ सध्या चर्चेत आहे. या प्रकल्पाशी संबंधित अभिनेत्री-निर्माती श्वेता राय यांनी दैनिक संवादात चित्रपटाची संकल्पना, कास्टिंग, लोकेशन्स आणि त्यांच्या वैयक्तिक संघर्षांवर मनमोकळेपणाने चर्चा केली. हा चित्रपट एका सामान्य मुलीच्या संघर्षाची आणि तिच्या हॉलीवूडपर्यंत पोहोचण्याची प्रेरणादायी कथा आहे, ज्यात भारतीय संस्कृतीची झलकही दिसेल….

Read More

सरकीचे पोते असलेला ट्रक उलटल्याने क्लिनर जखमी:मोर्शीजवळ दोन अपघात; अन्य एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर‎

मोर्शी ते अमरावती रोडवरील मडघे मंगल कार्यालयासमोर आज, शनिवारी सकाळी झालेल्या रस्ता अपघातात आयशर ट्रक उलटला. या अपघातात सरकी रस्त्यावर विखुरली. क्लिनरलाही जीव वाचविताना पायात जखम झाली. दुसऱ्या एका घटनेत मोर्शी-चांदूरबाजार रोडवरील रेल्वे गेटजवळच्या गतिरोधकावर वाहन अनियंत्रित झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीहून छत्तीसगढ येथे सरकीचे पोते असलेला आयशर ट्रक उलटून ट्रकची…

Read More

शहर पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; चार पकडले:शस्त्रे आणि दारू जप्त, मध्यरात्री केली कारवाई‎

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी रात्री आकस्मिकपणे ‘कोंबिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदी राबविण्यात आली. या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, अनेक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोम्बिंग ऑपरेशन शुक्रवारी रात्री दहा वाजता सुरू करण्यात आले. ते शनिवारी पहाटे दोन वाजेपर्यंत सुरू होती. शहरातील ८ पोलीस…

Read More