भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर महापालिकेचा मोठा यू-टर्न:तक्रारींचा भडका, प्रशासनाचा निर्णय बदलला; अभियंता बदल्या पूर्णपणे रद्द
मुंबई महापालिकेत झालेल्या 122 अभियंत्यांच्या बदल्यांवर अखेर पूर्णविराम देण्यात आला आहे. बदल्यांमध्ये कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’चे आरोप पुढे आल्यानंतर प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला. ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र सुरुवातीपासूनच या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अनेक तक्रारी, आक्षेप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे हे प्रकरण सतत चर्चेत राहिले होते. या…