शहागंज, बायजीपुरा, टीव्ही सेंटरमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित:उन्हाळ्यात नागरिक त्रस्त; तांत्रिक बिघाडामुळे रात्री उशिरापर्यंत वीज गायब
छत्रपती संभाजीनगर शहरात उन्हाचा पारा वाढत असताना, शहागंज, राजाबाजार, बायजीपुरा, जाधवमंडी आणि टीव्ही सेंटर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी शहागंज परिसरात तांत्रिक बिघाडामुळे तीन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झाला होता, जो मध्यरात्री १२ वाजता पूर्ववत करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ४ वाजता मौलाना आझाद चौकातील…