Headlines

फर्स्ट एसी कोचमध्ये उंदराने माजी अधिकाऱ्याला चावा घेतला:नाकातून रक्तस्त्राव झाल्याने ऊना-इंदूर एक्सप्रेसमध्ये आरडाओरड केली; रेबीजचे इंजेक्शन घ्यावे लागले

ऊना-इंदूर एक्सप्रेसच्या फर्स्ट एसी कोचमध्ये प्रवास करत असलेल्या 78 वर्षीय निवृत्त अधिकारी प्रवाशाच्या नाकावर उंदराने चावा घेतला. ही घटना रविवारी रात्री झोपेत असताना घडली. उंदराने चावा घेतल्याने कोचमध्ये खळबळ उडाली. इंदूरला पोहोचल्यानंतर कुटुंबीयांनी वृद्धाला कोकिलाबेन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्यांना रेबीजचे पहिले इंजेक्शन दिले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ट्रेनमध्ये प्रवास सुरू केल्यानंतर काही वेळातच कोचमध्ये उंदीर दिसू लागला…

Read More

जिल्हा परिषद शाळांमधील सुविधांबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही:संबंधितांवर कठोर कारवाईचा सरकारचा इशारा

राज्यातील शासकीय, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील भौतिक आणि मूलभूत सुविधांची सद्यस्थिती काय आहे, याचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत, विद्यार्थ्यांच्या हिताशी तडजोड खपवून घेतली जाणार नसून कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर थेट कठोर…

Read More

सीईओ गांधींकडून शाळांमधील सुविधांची पाहणी:प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शाळांची पाहणी सुरू केली आहे. विद्यार्थी सुरक्षा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि इतर आवश्यक सोयी या चार प्रमुख बाबींवर त्यांनी विशेष भर दिला असून, संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. गांधी यांनी…

Read More

मोर्शीत खळबळ!:बंद दुकानात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; ओळख पटवण्यासह मृत्यूचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

मोर्शी येथील प्रभुदयाल सिनेमा टॉकीज परिसरातील एका वर्षापासून बंद असलेल्या दुकानात ३५ ते ४० वर्षीय अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने परिसरात चर्चा सुरू आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिदास शिवआप्पा गंजिवाले (वय ६२, रा. बीएसएनएल ऑफिसजवळ) यांच्या मालकीचे हे दुकान अनेक वर्षांपासून बंद होते. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास…

Read More

नवी मुंबईत दूध भेसळीच्या रॅकेटचा पर्दाफाश:4,710 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट, लाखोंचा मुद्देमाल जप्त, 15 जणांवर गुन्हा

नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या दूध भेसळीच्या प्रकारावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. १९ ऑगस्ट रोजी केलेल्या तपासणीत ४,७१० लिटर भेसळयुक्त व संशयित दूध नष्ट करण्यात आले. याशिवाय पनीर, स्किम्ड मिल्क पावडर आणि क्रीमसह लाखो रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात १५ व्यक्ती आणि संबंधित…

Read More

विद्यार्थी दान नाही, हक्क मागत आहेत:आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधींचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, म्हणाले- विद्यार्थ्यांना भेटा अन् तातडीने प्रश्न सोडवा

महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमादरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुख्यमंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली आहे. राहुल…

Read More

शेवंती लागवड व संवर्धन कार्यशाळा:श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात यशस्वी आयोजन

श्री शिवाजी शिक्षण संस्थाद्वारा संचालित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने “शेवंती लागवड व संवर्धन” या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. अमरावती गार्डन क्लब आणि अमरावती हौशी बाग यांच्या समन्वयातून आयोजित या कार्यशाळेला विद्यार्थी, प्राध्यापक, बागकामप्रेमी आणि शेवंती उत्पादकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या आयक्यूएसी समन्वयक डॉ. संगीता इंगोले होत्या. मंचावर अमरावती गार्डन क्लबचे…

Read More

कंगनाचा टीकाकारांवर निशाणा:म्हटले- आशुतोष राणा, सोनू सूद, तापसी व राखी माझ्यासारखे 1% देखील यशस्वी झाले नाही, त्यांचे ज्ञान ऐकणार नाही

भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. त्यांनी आशुतोष राणा, सोनू सूद, राखी सावंत आणि तापसी पन्नू यांची नावे घेऊन म्हटले की, जर लोक त्यांच्यासारखे एक टक्काही यशस्वी झाले नसतील, तर त्या त्यांचे ज्ञान ऐकणार नाहीत. कंगनांनी बाबा रामदेव यांच्यावरही मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. कंगना म्हणाल्या- माझ्यासारखे एक टक्काही यश मिळवू शकले…

Read More

चांदूर रेल्वे स्टेशनच्या सुविधांसाठी ‘रेल रोको’ कृती समिती आक्रमक:खासदार, आमदारांना निवेदन; प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

चांदूर रेल्वे स्टेशनवर मूलभूत सुविधा आणि प्रमुख एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्याच्या मागणीसाठी ‘रेल रोको कृती समिती’ आक्रमक झाली आहे. समितीने खासदार अमर काळे आणि आमदार प्रताप अडसड यांना निवेदन सादर केले असून, स्टेशनच्या दुरुस्तीसह प्रवाशांच्या सुरक्षेची मागणी केली आहे. नागपूर–भुसावळ रेल्वे मार्गावरील चांदूर रेल्वे स्टेशनवर शहर आणि परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व कर्मचारी प्रवासासाठी…

Read More

सामदा शाळेत अज्ञातांनी घाण फेकली, वर्ग पटांगणात भरले:दुर्गंधीमुळे वर्गखोल्या बंद, विद्यार्थ्यांचे शिक्षण पटांगणात सुरू

दर्यापूर तालुक्यातील सामदा येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेत अज्ञात समाजकंटकांनी घृणास्पद कृत्य केले आहे. शाळेच्या वर्गखोल्या तसेच मुख्य दरवाजाच्या कुलपाला घाण चिकटवण्यात आली होती. ही बाब सोमवारी सकाळी शाळा उघडताना निदर्शनास आली, त्यामुळे वर्गखोल्या न उघडता विद्यार्थ्यांना शाळेच्या पटांगणात बसवून वर्ग भरवण्यात आले. सामदा येथील या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे १२२ विद्यार्थी शिक्षण…

Read More