Headlines

घटनेचा आदर कोण करते हे जनतेला ठाऊक:राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याची मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतली, काँग्रेस नेते सतेज पाटलांचा दावा

लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या उमेदवारांनी आणि नेत्यांनी आम्ही 400 पार करू आणि घटना बदलू, त्यासाठी आम्हाला बहुमत हवे आहे अशी वक्तव्ये देशभरात केली होती. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोण मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे, हे संपूर्ण देश उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. काँग्रेसवर बोट दाखवण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी स्वतःकडे लक्ष द्यावे. संविधानाचा खरा आदर कोण करतो, हे…

Read More

स्पर्धेच्या माध्यमातूनच घडेल भविष्यातील संवेदनशील पिढी:जिल्हा वाचनालयात निबंध व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा केला सन्मान‎

आजच्या एआयच्या काळात माहिती खूप मिळू शकेल परंतु खरे ज्ञान मिळवायचे असेल तर तुम्हाला पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. स्पर्धेच्या माध्यमातून चांगले लेखक कलाकार व संवेदनशील अशी पिढी घडणार असून त्यासाठी आपल्याला पुस्तके वाचन सातत्याने करावे लागेल, अशी अपेक्षा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मुळे यांनी व्यक्त केली. अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्यावतीने आयोजित लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि…

Read More

2 ट्रक उलटले; नगर-पुणे मार्ग साडेसहा तास ठप्प:सुपे पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहतूक वळवून मोठी कोंडी टाळली‎

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर जातेगाव (पारनेर) शिवारात गुरुवारी (२०) सकाळी सहाच्या सुमारास दोन ट्रक उलटल्याने महामार्गावरील वाहतूक दोन्ही दिशांनी तब्बल साडेसहा तास ठप्प झाली. मात्र, सुपे पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत तातडीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्याने मोठ्या प्रमाणावर होणारा वाहतूक खोळंबा टळला. दुपारी साडेबारा वाजता अपघातग्रस्त ट्रक हटविल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, पुण्याहून अहिल्यानगरकडे जाणारा ट्रक…

Read More

होमिओपॅथिक कॉलेजमध्ये विद्यार्थिनीला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचा आरोप

अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये महाविद्यालय प्रशासनाच्या कथित निष्काळजीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गुरुवारी महाविद्यालय परिसरात धरणे आंदोलन केले. गायत्री अवताडे (रा. नेवासा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालयात आपत्कालीन उपचारासाठी व ऑक्सिजन व्यवस्था नसल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी यावेळी केला. गायत्रीच्या मृत्यूस महाविद्यालयातील अपुर्‍या वैद्यकीय सुविधांचा…

Read More

बार्शी तालुक्यामध्ये खरीपातील पेरणी सरासरीपेक्षा 19.55 टक्क्यांनी अधिक:87 हजार 484 हेक्टरवर पेरणी पूर्ण; सोयाबीन पिकाला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती‎

अवर्षणग्रस्त आणि निसर्गाच्या लहरीवर अवलंबून असलेला रब्बीचा तालुका अशी ओळख असलेल्या बार्शी तालुक्यात अलीकडच्या काळात खरीप पिकांचे क्षेत्र वाढत आहे. मोठी नदी किंवा सिंचन प्रकल्पांची उपलब्धता नसल्याने तालुक्यातील शेती प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवल . तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या १२ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पिकनिहाय साप्ताहिक पेरणी अहवालानुसार, बार्शी तालुक्यात आतापर्यंत एकूण ८७ हजार ४८४.४५ हेक्टर क्षेत्रावर…

Read More

मस्क भारतातील गावे, दुर्गम भागांत इंटरनेट पोहोचवणार:11 हजार गावांत 4G नाही; स्टारलिंकचा लायसन्ससाठी पुन्हा अर्ज

एलन मस्क म्हणाले की, स्टारलिंकमुळे भारतातील दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये इंटरनेट पोहोचवता येईल. या दुर्गम गावांत व क्षेत्रांत अजूनही कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. एलन मस्क यांनी X वर ‘DogeDesigner’ च्या एका पोस्टला री-शेअर करत लिहिले, ‘स्टारलिंक भारतातील सर्वात कमी सुविधा असलेल्या…

Read More

कुर्डुवाडीत मोकाट श्वानांचा उच्छाद थांबेना शाळकरी मुलांसह वाहनचालकांना धोका:शहरातील नागरिकांमध्ये संताप, नगरपालिका प्रशासनाची डोळेझाक‎

शहरात सध्या मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वसामान्य नागरिक तीव्र भीतीच्या छायेत वावरत आहेत. मात्र, या अत्यंत गंभीर समस्येकडे नगरपालिका प्रशासन डोळेझाक करत असून, केवळ कागदी घोडे नाचवून वेळकाढूपणा कर . ​शहरातील सर्वच प्रमुख मार्गांवर मोकाट कुत्र्यांचे जत्थेच्या जत्थे फिरताना दिसत आहेत. हे कुत्रे चालत्या वाहनांवर झडप घालत असल्यामुळे अनेकदा…

Read More

Maharashtra Housing Policy Update; Chandrashekhar Bawankule Statement

राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. गेल्या दीड वर्षांत सुमारे 950 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांना पूर्ण अधिकार देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गेल्या 20 वर्षांपासून थांबलेल्या सर्व पदोन्नत्या मार्गी लावण . चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आदर्श घोटाळ्यानंतर महसूल विभागाच्या जागेवर गृहनिर्माण सोसायट्या स्थापन करण्यासाठी कोणतेही स्पष्ट धोरण अस्तित्वात नव्हते, असा उल्लेख…

Read More

छत्रपती संभाजीनगर-बीडमध्ये बनावट GST नोंदणीचा संशय:अंबादास दानवेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, 200 तक्रारींच्या चौकशीची मागणी

बीड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे GST नोंदणी, बोगस बिलिंग आणि पात्रता नसतानाही इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) मिळवल्याच्या संशयावरून आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात सरकारी महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करत दानवे यांनी स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल तपास करण्याची मागणी केली आहे….

Read More

Nifty Sensex Market Update; Share Bazaar Crash Today

मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच २१ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स ५० अंकांनी घसरून ७७,५०० वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही १० अंकांची घसरण असून, तो २४,२२० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार इंडेक्स लेव्हल पॉइंट चेंज टक्केवारीतील बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 6925 +67 +0.98% निक्केई (जपान) 66114 -273…

Read More