Headlines

उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांना सांगितीक मानवंदना:ढोलकी, गायन, तबलावादनाने 33 व्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

फरुखाबाद घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांना त्यांच्या ३३व्या स्मृतिदिनानिमित्त सांगितीक मानवंदना देण्यात आली. बहारदार ढोलकी वादन, किराणा घराण्यातील बंदिशींचे सुमधुर गायन आणि तालबद्ध तबलावादनातून ही आदरांजली अर्पण करण्यात आली. उस्ताद गुलाम रसूल खानसाहेब यांचे नातू आणि प्रसिद्ध तबलावादक सलीम अख्तर यांच्यासह त्यांच्या शिष्य परिवारातर्फे पुणे येथील भरत नाट्य मंदिर येथे या कार्यक्रमाचे…

Read More

सहाय्यक पोलीस निरीक्षकाची शासकीय क्वार्टरमध्ये आत्महत्या:नागपूरमध्ये घडली घटना; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

नागपूरमध्ये एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने शासकीय क्वार्टरमध्ये आत्महत्या केली आहे. ज्ञानेश्वर झोल असे मृत अधिकाऱ्याचे नाव असून, ते नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयातील ‘अर्ज व तक्रार’ शाखेत कार्यरत होते. ही घटना रविवारी मध्यरात्री १२ ते १ वाजेच्या सुमारास पीसीएमटी क्वार्टरमधील त्यांच्या निवासस्थानी घडली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनाम्याची प्रक्रिया…

Read More

कधीकाळी जंगलात दहशत, आता रॅम्पवर जलवा:कोसा साडी परिधान करून आत्मसमर्पण केलेल्या महिला नक्षलवाद्यांनी केला वॉक, देशभरातून मिळतेय प्रेम

रायपूरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त झालेल्या स्वदेशी एक्स्पोचे व्हिडिओ देशभरात व्हायरल होत आहेत. खरं तर, ज्या महिलांच्या नावाची कधीकाळी जंगलात दहशत होती, आज त्यांच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू झाला आहे. कार्यक्रमात मॉडेल्ससोबत 9 माजी महिला नक्षलवाद्यांनीही हँडलूम कपड्यांसह रॅम्प वॉक केला. हा फॅशन शो केवळ पारंपरिक वस्त्रांचे प्रदर्शन नव्हते, तर बदलत्या बस्तरची आणि मुख्य प्रवाहाशी जोडलेल्या…

Read More

'जीव गेला तरी चालेल, पण आंदोलनावर ठाम':मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा; 29 ऑगस्टच्या आंदोलनाची रणनीती ठरली

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत तज्ज्ञ आणि अभ्यासकांसोबत एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या महत्त्वाच्या बैठकीत सरकारसमोर यापूर्वी मांडण्यात आलेल्या मागण्या, त्याबाबतची कायदेशीर बाजू आणि सरकारने दिलेल्या एसओपी संदर्भात सविस्तर…

Read More

राहुल म्हणाले- सरकारच्या विरोधात उभ्या राहणाऱ्यांचे कौतुक व्हावे:म्हटले- विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन, शिवीगाळ आणि हिंसा झाली

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले की, सरकारच्या हिंसेविरुद्ध ठामपणे उभे राहिलेल्या भारतातील तरुणांचे धैर्य कौतुकास्पद आहे. त्यांनी पुढे म्हटले की, भाजपच्या लोकांकडून होणारी गैरवर्तणूक, शिवीगाळ आणि हिंसेचा सामना करणाऱ्या विद्यार्थिनींचेही कौतुक व्हायला हवे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांशी झालेल्या संवादाचा व्हिडिओही शेअर केला. या विद्यार्थ्यांनी गेल्या महिन्यात पेपरफुटीच्या मुद्द्यावर तत्कालीन शिक्षणमंत्री…

Read More

उजळंबकर वाचनालयात स्वातंत्र्य दिन सोहळा संपन्न:मान्यवरांच्या भाषणांनी कार्यक्रमात आणली रंगत; देशभक्तीपर गीतांनी सोहळ्याची शोभा वाढवली

कै. नारायणराव उजळंबकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाचा 80 वा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वि. ल. धारूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवशंकर मुंढे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर वाचनालयाचे कोषाध्यक्ष अजिंक्य उजळंबकर…

Read More

महावितरणचा वीजचोरांना तडाखा:राज्यात 19 हजारांवर वीजचोऱ्या उघड, जुलै महिन्यात तब्बल 11 हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

महावितरणने वीजचोरीविरुद्ध राज्यभरात धडक मोहीम सुरु केली असून गेल्या चार महिन्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीमध्ये १९ हजार ५९९ ठिकाणी वीजचोरी उघड झाली आहे. यामध्ये गेल्या जुलै महिन्यात पर्दाफाश झालेल्या तब्बल ११ हजार ३२ वीजचोऱ्यांचा समावेश आहे. थेट तारेच्या हूकद्वारे व मीटरमध्ये फेरफार केलेल्या १५ हजार ९६५ प्रकरणांत ३० कोटी ३६ लाख रुपयांची वीजचोरी…

Read More

रणवीर सिंहच्या नवीन 'प्रलय' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात:कल्याणी प्रियदर्शनसोबत दिसणार; 'धुरंधर'च्या यशानंतर रणवीरचा मोठा प्रोजेक्ट

अभिनेता रणवीर सिंहने त्याच्या पुढील चित्रपट ‘प्रलय’चे चित्रीकरण रविवारी मुंबईत सुरू केले आहे. निर्मात्यांच्या अधिकृत घोषणेनुसार, हा एक एंड-ऑफ-द-वर्ल्ड (जगाच्या अंताच्या) संकटावर आधारित ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. चित्रपटाची कथा मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, ज्यात विनाशकाळात मानवी जीवन वाचवण्यासाठीचा संघर्ष दाखवला जाईल. या प्रोजेक्टमध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिका साकारण्यासोबतच सह-निर्मात्याची जबाबदारीही सांभाळत आहे. चित्रपटात त्याच्यासोबत…

Read More

"ओबीसींची फसवणूक थांबवा, अन्यथा भाजपला घरी पाठवू":छगन भुजबळ पूर्णपणे भाजपकडे झुकलेले; हरिभाऊ राठोड यांची टीका

केंद्र सरकारने नुकताच जातनिहाय जनगणना करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, देशभरातील ओबीसी नेत्यांकडून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे. महाराष्ट्राचे मंत्री आणि ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी या निर्णयाचे स्वागत करत सामाजिक न्यायाच्या लढ्याला हे ऐतिहासिक यश आल्याचे म्हटले आहे. तसेच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले…

Read More

छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्ट लिपिक परीक्षेचा फज्जा:सर्व्हर डाऊन, किबोर्डही खराब; संतप्त विद्यार्थ्यांचा केंद्राबाहेरच ठिय्या

आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हायकोर्ट लिपिक पदासाठी ऑनलाइन परीक्षा पार पडत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरातील सेव्हन हिल परिसरातील सुराणा नगर येथील परीक्षा केंद्रावर या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे समोर आले आहे. परीक्षा सुरू होताच अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला असून, यामुळे शेकडो परीक्षार्थींची परीक्षा खोळंबली. विशेषतः दूरवरून आलेल्या उमेदवारांना या अचानक…

Read More