दोन दिवसांत 12 हजार पर्यटकांची अजिंठ्यास भेट:वाहनतळाची जागा अपूर्ण पडल्याने वाहने रस्त्यावर
स्वातंत्र्य दिनासह सलग दोन दिवस सुट्या असल्याने पर्यटकांनी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीला मोठी गर्दी केली होती. या दोन दिवसांत १२ हजार ५०० पर्यटकांनी लेणीला भेट दिली. पर्यटकांची संख्या वाढल्याने पर्यटन व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पर्यटकांच्या वाहनांना जागा अपुरी पडल्याने वाहने जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर उभी करावी लागली. सलग सुट्यांमुळे अजिंठा लेणीमध्ये पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. पावसाळा…