महापालिका लिपिक मालमत्ता कर कमी करण्यासाठी लाच घेताना पकडला:1 लाख 20 हजार रुपयांसह सांगवीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील एका लिपिकाला मालमत्ता कर कमी करण्यासाठी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने १ लाख २० हजार रुपयांची लाच स्वीकारली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी दुपारी सांगवी परिसरातील आनंदनगर येथे ही कारवाई केली. पकडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव उमेश सुभाष कुटे (वय ३७) आहे. तो पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सांगवी येथील कर आकारणी आणि कर संकलन विभागीय…