गणेशोत्सवात ध्वनी-प्रकाशाचा अतिरेक रोखा:सातारच्या ज्येष्ठ नागरिकांची पोलिसांकडे मागणी, डीजेसह लेझर शोवर नियंत्रण ठेवण्याचे निवेदन
गणेशोत्सवाच्या उत्साहाला ध्वनी व प्रकाशाच्या अतिरेकाचे गालबोट लागू नये, यासाठी डीजे-डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज आणि तीव्र लेझर लाईटवर कठोर निर्बंध घालावेत, अशी मागणी साताऱ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे. कै. डॉ. कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी (चाचा) फौंडेशन व सातारा समन्वय समितीच्या वतीने याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवात मिरवणुका व विविध कार्यक्रमांदरम्यान ध्वनिक्षेपकांचा मोठ्या आवाजात वापर…