Headlines

गंगापूर तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का:अ‍ॅड. ऋषिकेश दिलीपराव धाट शिंदे गटात, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेले बालवयापासून कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले अ‍ॅड. ऋषिकेश दिलीपराव धाट यांनी १ सप्टेंबर रोजी मुंबई येथील नंदनवन निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नंदनवन निवासस्थानी खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते अ‍ॅड. ऋषिकेश धाट यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी खासदार संदिपान भुमरे…

Read More

नागपुरात आत्मसमर्पीत नक्षली भूपतींच्या नियुक्तीला विरोध:गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय समन्वयक पदावर नियुक्ती; जन संघर्ष समितीने फेरविचाराची मागणी केली

गडचिरोलीतील नक्षलवादी चळवळीत सक्रिय राहिलेल्या मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती यांची गोंडवाना विद्यापीठात प्रशासकीय समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला नागपूरच्या ‘जन संघर्ष समिती’ने कडाडून विरोध केला आहे. समितीने म्हटले आहे की, आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, महत्वाच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय पदावर जबाबदारी देण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या भूतकाळातील प्रकरणांची आणि…

Read More

Nagpur Online Adoption Drive: 7 Children Find Legal Families

नागपूर जिल्ह्यात अनाथ आणि गरजू बालकांना सुरक्षित कौटुंबिक वातावरण मिळावे या उद्देशाने राबवल्या जाणाऱ्या दत्तक प्रक्रियेत मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय दत्तक प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ३ सप्टेंबर २०२६ रोजी सात बालका . नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार पार पडली. यामध्ये फ्रान्समधील एका दांपत्याने एका बालकाला दत्तक घेतले. याशिवाय,…

Read More

'माझं गाव आरोग्य संपन्न गाव' अभियान:30 वर्षांवरील नागरिकांची होणार आरोग्य तपासणी, पाच लाख नागरीकांचा असणार सहभाग

हिंगोली जिल्ह्यात ता. 1 सप्टेबर ते ता. 10 डिसेंबर या कालावधीत ‘माझे गांव आरोग्य संपन्न गांव’ उपक्रमात 30 वर्षावरील 5 लाख नागरीकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामुळे तातडीने आजारांचे निदान होऊन औषधोपचार केले जाणार आहेत. यातून ग्रामीण भागातील नागरीकांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी…

Read More

सण-उत्सवांतील महाप्रसादावर आता FDA ची करडी नजर:तुकाराम मुंढेंकडून 'स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स' लागू; सणांचे तीन स्तरांत वर्गीकरण

सण-उत्सवांच्या काळात भाविकांना वाटल्या जाणाऱ्या महाप्रसाद, लंगर आणि भंडाऱ्यांमधील अन्नाच्या गुणवत्तेवर आता अन्न आणि औषध प्रशासनाची करडी नजर असणार आहे. सणांच्या काळात होणारी अन्नातील भेसळ रोखण्यासाठी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘स्टँडिंग ऑर्डर्स फॉर ऑल फेस्टिव्हल्स’ हा ऐतिहासिक आणि धर्मनिरपेक्ष निर्णय लागू केला आहे, ज्याअंतर्गत महाप्रसाद आणि अन्नदानाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तपासणी केली जाणार आहे….

Read More

Devendra Fadnavis Statement; Vidyanand Bapat Attack & Disha Salian Case

विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेची राज्याच्या गृह मंत्रालयाने गंभीर दखल घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार बापट यांना पोलिस संरक्षण देण्यात येणार आहे. यापुढे विद्यानंद बापट यांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त तैना . पुण्यातील गणेशोत्सवात डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर झालेली मारहाण अत्यंत अयोग्य असल्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र…

Read More

न्यायालयात प्रशासनावर खापर फोडले:महिला प्रकरणांतील सुनावणीदरम्यान 'विधी व न्याय'चे सचिव दिलीप घुमारे यांना हायकोर्टाची नोटीस

महिला प्रकरणातील सुनावणीदरम्यान विधी व न्याय विभागाचे सचिव दिलीप घुमारे यांनी न्यायालय प्रशासनावर खापर फोडले. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलीप घुमारे यांना न्यायालयाच्या अवमानाची थेट नोटीस बजावली असून, या प्रकरणी पुढील सुनावणी ११ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे. महाराष्ट्रामध्ये महिला आणि बालकांवरील अत्याचार तसेच कौटुंबिक हिंसेच्या प्रकरणांची संख्या २ लाख ३५ हजारांवर पोहोचली आहे. २०१३ मध्ये…

Read More

पुणे दहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार 'दशावतार':आनंदनाथ ट्रस्ट आणि राष्ट्रप्रथम ट्रस्टतर्फे 4 व 5 सप्टेंबरला विविध सांस्कृतिक कार्यक्रम

दहीहंडी हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणारा उत्सव आहे. या उत्सवाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन आनंदनाथ ट्रस्ट आणि राष्ट्रप्रथम ट्रस्ट यांनी अनोखी दहीहंडी साजरी करण्याचे ठरवले आहे. ‘पुण्याच्या अभिमानाची दहीहंडी, पुण्याची सोन्याची दहीहंडी’ या संकल्पनेखाली हा उत्सव साजरा केला जाईल. या महोत्सवात पुणेकरांना कोकणातील प्रसिद्ध ‘दशावतार’ नाट्य अनुभवता येणार आहे, अशी माहिती पुणे…

Read More

ध्वनिप्रदूषणावर बोलणाऱ्या कार्यकर्त्याला मारहाण, धमकी:महाराष्ट्र अंनिसकडून तीव्र निषेध, पोलिसांना कठोर कारवाईची मागणी

पुण्यातील टिळक रोड परिसरात सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण करून धमकी दिल्याच्या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) तीव्र निषेध केला आहे. बापट हे ध्वनीप्रदूषणाच्या प्रश्नावर एका वृत्तवाहिनीशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अंनिसचे मिलिंद देशमुख आणि नंदिनी जाधव यांनी सांगितले की, ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न कोणत्याही एका धर्माचा, उत्सवाचा किंवा व्यक्तीचा नाही. तो नागरिकांचे…

Read More

वसमतमध्ये तिरडी आंदोलन:सेनगाव, गोरेगाव, आखाडा बाळापूर, जवळा बाजार बंदला मोठा प्रतिसाद, तीन ठिकाणी रास्तारोको

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास हिंगोली जिल्हयातून मोठा पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी ता. ३ वसमत येथे २८८ आमदारांचे तिरडी आंदोलन करण्यात आले. तर सेनगाव, गोरेगाव, आखाडा बाळापूर, जवळाबाजार बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या बंदमध्ये सर्वच व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील…

Read More