Headlines

626 कलावंतांनी दिल्या मुलाखती: मानधन योजनेतून निवडणार 100 जण; जिल्हा परिषदेत कला सादरीकरण



अमरावती जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी कलावंतांच्या मुलाखती सुरू आहेत. जिल्ह्यातील ६२६ उमेदवारांनी मुलाखत दिली असून, त्यापैकी १०० जणांची निवड होणार आहे.

.

मुलाखतीसाठी आलेले उमेदवार सभागृहात आणि व्हरांड्यात वाद्यांची तयारी करत होते. काही जण नाट्यछटा, पद किंवा अभंगाचा सराव करत होते. उमेदवारांनी पारंपरिक वाद्यांसह कलेचे सादरीकरण केले. काही जण लोककलेला साजेसे पारंपरिक पोशाख घालून आले होते.

निवड समिती उमेदवारांची कागदपत्रे तपासत आहे. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्यक्ष कलागुणांचीही पारख केली जात आहे. छाननीनंतर निकषांत बसणाऱ्या कलावंतांची निवड करून त्यांना मानधन योजनेचा लाभ दिला जाईल.

समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आशिष येरेकर आहेत. अशासकीय सदस्यांमध्ये गजानन देशमुख, गणेश कलाणे, विष्णू सोळंके, राजेंद्र महल्ले, छाया दंडाळे, हरीश हजारे, पंकज पोहोकार, कमलाकर देशमुख, शिवकुमार पाटील आणि अनिता गावंडे यांचा समावेश आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस समितीचे सदस्य सचिव आहेत.

मोठ्या जिल्ह्यांसाठी संख्या वाढवण्याची मागणी

कलावंतांची संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी समितीतील अशासकीय सदस्यांनी केली आहे. राज्यभर कलावंतांच्या संख्येसाठी एकच सूत्र आहे. वाशिम आणि पालघरसारखे छोटे जिल्हे तसेच अमरावती आणि यवतमाळसारखे मोठे जिल्हे एकाच निकषावर मोजले जातात.

अमरावतीला कला, अध्यात्म आणि साहित्याचा वारसा असल्याने १०० ही संख्या कमी वाटते, असे सदस्यांचे म्हणणे आहे. मोठ्या जिल्ह्यांसाठी संख्या वाढवण्याची मागणी शासनाकडे पाठवली जाईल, असे समितीचे सदस्य सचिव बाळासाहेब बायस यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *