Headlines

65 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक:आळंदी पोलिसांनी ऑनलाइन फसवणूक टोळीतील आरोपीला केली अटक




देशातील विविध राज्यांतील तब्बल ६५ नागरिकांना इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आणि इतर ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात अडकवून सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. सचिन संजय काळे (वय २५, रा. गोडाऊन चौकाजवळ, मोशी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आळंदी पोलिसांनी सायबर गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपी सचिन काळे याच्या नावावर विविध बँकांमध्ये उघडण्यात आलेली खाती ऑनलाइन फसवणुकीत वापरली जात असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासात आरोपीने स्वतःच्या नावावर नऊ बँक खाती उघडून ती सायबर फसवणुकीत वापरासाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवरील माहितीनुसार देशातील विविध राज्यांतील ६५ नागरिकांची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. आरोपीच्या नऊ बँक खात्यांमध्ये तब्बल १ कोटी १५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात इतर साथीदारांचा शोध सुरू असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. नागरिकांनी आपली बँक खाती, एटीएम कार्ड, सिमकार्ड किंवा आर्थिक व्यवहारासाठीची इतर साधने अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देऊ नयेत. अशा खात्यांचा वापर सायबर फसवणुकीसाठी होऊ शकतो, त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *