Headlines

70 वर्षानंतर खामगावात 24 तासात 146 मिमी. पाऊस:अंडरपासमध्ये 15 फूट पाणी




सात दशकाच्या कालखंडानंतर शहरात प्रथमच ३१ जुलैच्या सकाळी आठ वाजेपर्यंत १४६.२मिलिमीटर अर्थात सहा इंचाच्यावर पाऊस बरसला आहे या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते आणि गेल्या दोन दिवसापासून शहरवासीयांना सूर्यदर्शन झाले नाही या पावसामुळे शहरातील खोलगट भागात व अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. तसेच साईनगर कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाखालील भुयारी मार्गावर सुमारे आठ ते दहा फूट पाणी साठल्याने या भागातील नागरिकांना जीव धोक्यात टाकून पाण्यातून मार्ग काढावा लागला. बंद केलेले रेल्वे गेट पूर्ववत सुरू करावे अशी मागणी साई नगरातील संतप्त नागरिकांनी करीत खामगाव जलंब रेल्वे मार्गावरील वाडी गावाजवळील रेल्वे रुळावर काही तास ठिय्या मांडला होता. त्यामुळे मोटार पंपाद्वारे पाण्याचा उपसा करत मार्ग मोकळा करून दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *