Headlines

73 गुन्हे दाखल; 2.32 कोटींचा मुद्देमाल ताब्यात:ग्रामीण पोलिसांचे ‘ऑपरेशन ऑल आऊट’




ग्रामीण पोलिस दलाने जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवून मोठी कारवाई केली आहे. शनिवारी रात्री ६ ते २१ जूनच्या पहाटे ६ वाजेपर्यंत राबवलेल्या या धडक मोहिमेत जिल्ह्यात ७३ गुन्हे दाखल करून ७७ आरोपींना अटक केली. कारवाईत १ कोटी ९८ लाखांची ११ वाळूची वाहने, गावठी कट्टे, तलवार, गुटखा, गोमांसासह २ कोटी ३२ लाख ४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी व ठाणे प्रभारींनी ही कारवाई केली. गौण खनिजाची चोरी व अवैध वाहतूकप्रकरणी ८ गुन्हे दाखल करून १ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल व ११ वाहने जप्त केली. यापूर्वीच्या गुन्ह्यांतील ६० वाहने व १२ चालकांचे परवाने रद्द करण्याचा प्रस्ताव आर.टी.ओ.कडे पाठवला आहे. दहशत माजवणाऱ्यांकडून १ लाख २३ हजार किमतीचे २ गावठी कट्टे, ४ जिवंत काडतुसे आणि १ तलवार जप्त करून २ गुन्हे नोंदवले. गावठी दारूवर ९ गुन्हे नोंदवून ९ आरोपींना अटक केली, तर विनापरवाना दारू विकणाऱ्या ३१ आरोपींवर गुन्हे दाखल करून ६८५ बाटल्या जप्त केल्या करण्यात आल्या आहेत. २० आरोपींकडून ५.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त जुगार खेळणाऱ्या २० आरोपींकडून १० दुचाकी व ५.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गुटख्यावर ६ गुन्हे नोंदवून १२.३० लाखांचा माल जप्त केला. गोवंश तस्करीविरुद्ध २ गुन्हे दाखल करून ३ आरोपींना अटक केली. १२.८४ लाखांचे १२० किलो गोमांस जप्त केले आहे. अवैध कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांवर पोलिसांचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राहील. भविष्यातहअशाच प्रकारे अचानक नाकाबंदी, सर्च आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून गुन्हेगारांवर अत्यंत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – प्रकाश जाधव, पोलिस अधीक्षक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *