Headlines

बळेवाडीत एआय माध्यमातून ऊस उत्पादन शेती कार्यशाळा:ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शन‎




बळेवाडी (ता. बार्शी) येथील श्री स्वामी समर्थ मंदिर नमो नैसर्गिक व आत्मनिर्भर कृषी व ग्राम विकास प्रबोधिनी येथे गुरुवारी (दि. १४) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ भारत कृषीरत्न डॉ. विजय भटकर यांच्या ऑनलाईन मार्गदर्शनाखाली, अवघ्या २०० रुपये वार्षिक खर्चात ए.आय. (AI) टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून १०० टन ऊस उत्पादन व नैसर्गिक शेती या विषयावर शेतकऱ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेत बंगळुरूचे सेन्सरलेस ए.आय. टेक्नॉलॉजी डी.जी. क्रॉप सायन्स संशोधक शास्त्रज्ञ डॉ. धनंजय झिंगे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी प्रत्यक्ष ऊस प्लॉटवर जाऊन शेतकऱ्यांना ए.आय. तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन कसे वाढवावे, याचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रबोधिनीचे संस्थापक नानासाहेब कदम यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या परकीय चलन बचत आवाहनास प्रतिसाद देत, बळेवाडी येथील प्रगतशील शेतकरी समाधान पाटील यांचा नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा ऊस प्लॉट उपस्थित शेतकऱ्यांना दाखवला. यावेळी शेतकऱ्यांना खालील तांत्रिक माहिती देण्यात आली. जवळगाव (ता. बार्शी) येथील ड्रॅगन फ्रुट तज्ज्ञ प्रताप डेंगळे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. दुष्काळी भाग किंवा अल्प पाण्यात, हलक्या जमिनीत ड्रॅगन फ्रुटची शेती कशी वरदान ठरू शकते, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. शेतीचा यशस्वी पॅटर्न . खत व्यवस्थापन: तीन महिन्यांच्या २६५ ऊस जातीच्या प्लॉटला कोणताही बेसल डोस दिलेला नाही. . स्प्लिट फर्टिगेशन: स्प्लिट फर्टिगेशनचा प्रभावी वापर. . स्वनिर्मित घटक: बांधावरच मायकोरायझा, अझिटोबॅक्टर, वेस्ट डी कंपोजर, फुलविक ॲसिड, अमिनो ॲसिड आणि ०:५२:३४ तयार करून वापरल्याची माहिती प्रशिक्षणादरम्यान देण्यात आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *