Headlines

हिंगोलीत मोबाईलवरून वडिलांनी टोकले:16 वर्षीय मुलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, बिबथर गावावर शोककळा




कळमनुरी तालुक्यातील बिबथर येथे एका सोळा वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतदेहावर शनिवारी ता. 16 सकाळी आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे किरकोळ कारणावरून राग आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबथर येथे गोविंद शिंदे हे त्यांच्या कुटु्बियांसह राहतात. त्यांचा शिवम शिंदे हा एकुलता एक मुलगा असून दोन मुली आहेत. शेतीच्या उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मुलगा शिवम हा हिंगोली येथील एका शाळेत शिक्षण घेत होता. सध्या सुट्ट्या असल्यामुळे तो गावाकडे बिबथर येथे गेला होता. दरम्यान, शुक्रवारी ता. 15 सायंकाळी शिवम आखाडा बाळापूर येथे गेला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो आखाडा बाळापूर येथून गावी आला. यावेळी घरात गेल्यानंतर त्याने एका खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ होऊन देखील शिवम बाहेर येत नसल्याने दरवाजा तोडून पाहणी केली असता शिवम गळफास घतलेल्या स्थितीत आढळून आला. या प्रकारानंतर त्याला तातडीने आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, उपनिरीक्षक रोहिनकर, जमादार शेख अन्सार, शिवाजी पवार यांच्या पथकाने रुग्णालयात जाऊन पाहणी केली. दरम्यान, मयत शिवम हा शिंदे कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. रागाच्या भरात घेतला गळफास मयत शिवम यास मोबाईल आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी पैसे दिले होते. त्यानंतर त्याने आखाडा बाळापूर येथून मोबाईल आणला होता. मात्र महागाचा मोबाईल कशाला पाहिजे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *