Headlines

छत्री तलावावर पक्क्या बांधकामासाठी‎महापालिकेचा २० कोटींचा खर्च निरर्थक‎:प्रकरण हरित लवादापर्यंत पोहोचले,५ आॅगस्टला पुढील सुनावणी‎




प्रतिनिधी । अमरावती छत्री तलावावर मनपाने सौंदर्यीकरणासाठी २० कोटी रु. खर्च करून पक्के बांधकाम केले. यात १३ बांधकामं हे पानथळ (वेटलँड) जमिनीवर असल्याचा दावा करीत पोहरा जंगल बचाव समितीने राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) २०१९ मध्ये याचिका दाखल केली. याचिकेच्या अनुषंगाने एनजीटीने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी उत्तर मागितले होते. खरेच पानथळ जमिनीवर बांधकाम आहे की, नाही यासाठी तज्ज्ञांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पर्यावरण बदल सचिव, नागपुरातील निरीच्या तज्ज्ञांच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी केली. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी छत्री तलावावर जाऊन पाहणी केल्यानंतर महापालिकेला यापुढे कोणतेही बांधकाम करू नका, असे कडक निर्देश दिले. परिणामी छत्री तलावावर सौंदर्यीकरणासाठी केलेला खर्च हा मागील ७ वर्षांत निरर्थक ठरला असेच म्हणावे लागेल. कारण, ना पर्यटकांना याचा फायदा झाला ना शहराच्या सौंदर्यात भर पडली. छत्री तलाव मागील ७ वर्षांपासून बंद स्थितीत आहे.या प्रकरणी ५ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी वादी व प्रतिवादींनी आपापले प्रतिज्ञापत्र एनजीटीपुढे सादर उर्वरित. पान ४ पानथळ क्षेत्रावर अवैध बांधकाम ^आमचा विकास कामाला विरोध नसून, महापालिकेने तलावाचे सौंदर्यीकरण करण्याच्या नावावर पानस्थळ क्षेत्रावर नियमबाह्य केलेले बांधकाम पूर्णपणे अवैध आहे. त्यामुळे लगतच असलेल्या राखीव जंगलातील वन्य प्राण्यांचा पाणी व अन्न मिळवण्याचा मार्गच खुंटला आहे. ही शहराच्या पर्यावरणासाठी धोकादायक बाब होय. – नीलेश कंचनपुरे, याचिकाकर्ते, पोहरा जंगल बजाव समिती, अध्यक्ष वॉर संस्था. सत्य शोधण्यासाठी वेटलॅण्ड प्राधिकरणाने कोणती कारवाई केली एनजीटी वेटलॅण्ड प्राधिकरणानेही आपली जबाबदारी सांभाळत पानथळ जमिनीपासून नेमके किती अंतरावर बांधकाम करता येते, याबाबत स्पष्टीकरण द्यावे. तसेच याचिकाकर्त्यांनी १३ बांधकामं ही पानथळ जमिनीत ५० मी. अंतराच्या आत असून, छत्री तलावाच्या हाय फ्लड पातळीतच येत असल्याचे म्हटले आहे. याचिकाकर्त्यांचा दावा खरा की खोटा याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे. या प्रकरणी सत्य शोधण्यासाठी त्यांनी कोणती कारवाई केली, याचाही त्यात उल्लेख करावा, असे आदेश एनजीटीने दिले आहेत. विकासकामे करण्यासाठी निवडलेल्या जागेला विरोध वन्य जीवांच्या अधिवासाला लागून महापालिका क्षेत्रात असलेल्या ब्रिटिशकालीन छत्री तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावावर केलेले पक्के बांधकाम हे पर्यावरणासाठी धोकादायक, पानथळ जमिनीवर केले आहे. आमचा विकासकाम किंवा बांधकामाला विरोध नाही. मात्र,निवडलेल्या जागेला विरोध आहे. छत्रीतलावावर समोरच्या बाजुने बांधकाम केले तर वन्यप्राणी व पर्यावरण सुखरूप राहून शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यात मदत होईल, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *