Headlines

बाल कीर्तनकार महोत्सवात बालकांचा सहभाग‎:अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या वतीने मुंबईत करण्यात आले आयोजन‎




प्रतिनिधी | अकोला अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या वतीने मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या बाल कीर्तनकार महोत्सवात महानगरातील चार बाल कीर्तनकारांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट कीर्तने सादर केली. मुंबईकरांची मने जिंकली. अ. भा. कीर्तन संस्थेचे अध्यक्ष माधव खरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईच्या दादर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सभागृहात हा महोत्सव आयोजित करण्यात आला. नागपूर, पुणे, मुंबई, नेरळ यांसह अनेक जिल्ह्यांतील बाल कीर्तनकारांनी सहभाग घेतला. कीर्तन सादर केले. यात स्थानिक आदर्श गोसेवा कीर्तनकुल येथील डॉ. अभय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत अलंकारचे प्रशिक्षण घेणारे बाल विद्यार्थी दीप मंगेश कडू, स्मरण यशवंत देशपांडे, आराध्या प्रफुल लक्रस, स्वरांगी परेश व्हरसाळे आदींनी सहभाग घेतला. कमी वयात कीर्तनाच्या माध्यमातून वकृत्व सादर करणाऱ्या या चार बाल कलाकारांची यावेळी वाहवा करण्यात आली. अ. भा. कीर्तन संस्थेच्या विश्वस्तांनी त्यांना विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, प्रशस्तीपत्र, भेटवस्तू बहाल केल्या. त्यांचा गौरव करण्यात आला. या कीर्तनकारांना हार्मोनियमची साथ डॉ. अभय कुलकर्णी यांनी केली. तसेच कीर्तनकारांचे आई-वडील मंगेश व ज्योती कडू, यशवंत व प्रज्ञा देशपांडे, प्रफुल व सुविधा लक्रस, परेश व सोनाली व्हरसाळे आदींचाही सन्मान करण्यात आला. या बाल कीर्तनकारांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *