Headlines

Mahavitran Solar Scheme: 1kW Solar System for Rs 2500



भारत सरकारच्या प्रधानमंत्री सुर्यघर मोफत योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन व महावितरणच्या वतीने 1 किलोवॅटची छतावरील सोलर सिस्टीम योजना विशेष स्मार्ट योजना नावाने राबविण्यात येत आहे. ही योजना अनुदानावर आधरित असल्याचे वीज कंपनीच्या सुत्रांनी सांगितले.

.

एक किलोवॅट छतावरील सौरऊर्जा प्रणालीस केंद्र व राज्य् शासनाकडून अनुदान उपलब्ध् असणार आहे. महावितरणकडुन राबविण्यात येणाऱ्या या योजनेत सौर प्रणालीसाठी भारतीय बनावटीचे आयईसी प्रमाणित सोलर मॉडयूल्स् वापरण्यात येत आहे. पुरवठादारां मार्फत 5 वर्ष देखभाल व दुरुस्ती असणार असून योजनेत भाग घेण्यासाठी राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी आवश्य्क आहे.

मराठवाड्यात वैध घरगूती वीज जोडणी असणाऱ्या ग्राहकांनाच या योजनेत सहभाग नोंदविता येईल. सौर यंत्रणा बसविण्यासाठी घराच्या छतावर पूरेशी जागा असावी, ग्राहकांने इतर कोणत्याही सौर अनुदानित योजनेचा लाभ घेतलेला नसावा. फक्त् घरगुती ग्राहकच या योजनेसाठी पात्र असतील. मागील 12 महिण्यातील प्रत्येक महिण्यात 100 यूनिटपेक्षा कमी वीज वापर असणारे ग्राहकच योजनेत पात्र ठरतील. दारिद्रय रेषेखालील व आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील ग्राहकांना प्राधान्य् असणारी ही योजना आहे.

वीज बिलांचा भार कमी करणे, सौरऊर्जेतून स्वयंपूर्णता वाढविणे, शिल्ल्क वीज विकूण ग्राहकांना अतरिक्त्‍ उत्पन्नाच्या संधी प्राप्त् करणे, पर्यावरणपूरक व स्वच्छऊर्जा वापर वाढविणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध् करुन हरित विकासाला चालना देण्यासाठी ही योजना महत्वाची आहे.

दारिद्रय रेषेखालील ग्राहकांना योजनेत एक किलोवॅटसाठी एकूण 47,500 रुपयांचे अनुदान असुन 2500 रुपयांचा हिस्सा ग्राहकांनी भरावयाचा आहे. अनुसूचित जाती, जमातींच्या ग्राहकांसाठी एकूण अनुदान 45000 इतके असून पाच हजार इतका ग्राहक हिस्सा भरणे आवश्यक आहे. सर्वसाधारण गटातील व इतर मागासवर्गीय वीज ग्राहकांसाठी 40,000 रुपयांचे अनुदान असून त्यांनी दहा हजार रुपयांचा ग्राहक हिस्सा भरणे गरजेचे आहे. ही योजना दरमहा 100 यूनिटपेक्षा कमी वीज वापर असणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *