Headlines

अखंड हरिनाम सप्ताहात प्रथमच भव्य रिंगण सोहळा:टाळ-मृदंगाचा निनाद, अभंगांच्या सुरांनी दुमदुमले पैठण शहर; भाविकांनी टाकली पावली‎



दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या परंपरागत अखंड हरिनाम सप्ताहात प्रथमच भव्य रिंगण सोहळा झाला. वारकरी संप्रदायातील भक्तिरस, टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष, अश्व रिंगणाच्या दर्शनाने शहर भक्तिमय झाले. पैठणक

.

संस्थानाधिपती रावसाहेब महाराज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहादरम्यान नगर प्रदक्षिणा झाली. खंडोबा मंदिर ते बसस्थानक या मार्गावर पारंपरिक पद्धतीने अश्वाचे उभे रिंगण साकारले गेले. वारकरी भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात पावली खेळली. परिसरात भक्तिमय उत्साह पसरला.

यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात अश्वाचे गोल रिंगण झाले. रिंगण पाहण्यासाठी शहरातील नागरिकांची मोठी गर्दी झाली. सोहळ्यात प्रथम उभी पावली झाली. त्यानंतर बसून पावली झाली. अश्व रिंगण झाले. टाळकऱ्यांची रिंगण झाली. ध्वज रिंगण झाले. शेवटी सर्व वारकरी भाविकांनी गोल प्रदक्षिणा घातली. हरिनामाच्या गजरात रिंगण पूर्ण झाले. अनेक भाविकांनी हा सोहळा मोबाइलमध्ये कैद केला.

या कार्यक्रमासाठी संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने नाथभक्त, वारकरी उपस्थित होते. भाविकांमुळे मंदिर परिसर, प्रमुख रस्त्यांवर दिवसभर गर्दी दिसली.

कार्यक्रमास संकेश्वर पीठाचे शंकराचार्य अभिनव सच्चिदानंद महास्वामी महाराज, प्रसाद महाराज अमळनेरकर, मोहननाथ महाराज पैठणकर, उद्धव महाराज कुकरमुंडेकर, शरदचंद्र महाराज देगलूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रिंगण सोहळा शांततेत, नियोजनबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी पैठण पोलिस ठाण्याने विशेष बंदोबस्त ठेवला. भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य नियोजन केले. कार्यक्रम निर्विघ्न पार पडला.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी भास्कर महाराज ओक, मार्तंड महाराज फदाट, प्रवीण महाराज गोसावी, राघव महाराज गोसावी, विशाल शास्त्री दाणी, ओंकार गाणी, गणेश चिंधे, गोवर्धन छडीदार, कृष्णा टकले, ऋषी साळुंके, संजय साळुंके, सुप्रिया गोसावी, मनवा गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले. रिंगण सोहळ्याने वारकरी परंपरेला नवचैतन्य दिल्याची भावना भाविकांनी व्यक्त केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *