Headlines

जनगणना कामात गैरहजर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल:सिंहगड रोड परिसरात राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याने प्रशासनाची कठोर कारवाई




पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सुरू असलेल्या जनगणना कामात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. विनाकारण गैरहजर राहणाऱ्या आणि आदेशांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंहगड रोड परिसरात जनगणनेसाठी एकूण १,१७४ ब्लॉक निश्चित करण्यात आले आहेत. या कामासाठी १,१७४ प्रगणक (Enumerators) आणि १९२ सुपरवायझर (Supervisors) यांची नियुक्ती करण्यात आली होती. जलसंपदा पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि इतर शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना या संदर्भात नियमानुसार नियुक्ती आदेश जारी करण्यात आले होते. स्पष्ट सूचना आणि आदेश असूनही अनेक कर्मचाऱ्यांनी जनगणनेच्या कामाकडे दुर्लक्ष करत कर्तव्यावर गैरहजर राहणे पसंत केले. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. सहाय्यक आयुक्त विजयकुमार वाघमोडे यांनी या संदर्भात कडक कारवाईचा निर्णय घेतला आहे. गैरहजर प्रगणकांवर ‘जनगणना अधिनियम १९४८’ च्या कलम ११ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत बोलताना सहाय्यक आयुक्त विजयकुमार वाघमोडे म्हणाले, “जनगणनेचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. जे कर्मचारी विनाकारण गैरहजर राहिले किंवा कर्तव्यात कसूर केली, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.” तरुणाच्या डोक्यात गज घालून मोबाइल हिसकावला पुणे शहरात लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. धनकवडीत २५ लाखांची रोकड लूट, तसेच बिबवेवाडीत डिलिव्हरी बॉयला लुटण्याच्या घटना ताज्या असतानाच कात्रज-कोंढवा रस्त्यावर पादचारी तरुणाच्या डोक्यात गज घालून दुचाकीस्वार चोरट्यांनी मोबाइल हिसकावून नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कात्रज परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. २४ मे रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तरुण दूध आणण्यासाठी घरातून बाहेर पडला. कात्रज-कोंढवा रस्त्यावर माऊलीनगर बस थांब्याजवळ दुुचाकीवरुन आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्याला अडवून पैशांची मागणी केली. तरुणाने नकार दिल्यानंतर चोरट्यांनी शिवीगाळ केली. तरुणाच्या डोक्यात गज घातला. गज घातल्याने तरुण जखमी झाला. त्यानंतर चोरट्यांनी तरुणाच्या हातातील दहा हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासलेे असून, सहायक पोलीस निरीक्षक स्नेहल थोरात तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *