![]()
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचे चित्र स्पष्ट झाले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनंतर भाजपने मोठी राजकीय आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीसाठी असलेल्या 17 जागांपैकी 14 ठिकाणी भाजपचे संख्याबळ आणि प्रभाव दिसत असतानाही पक्षाने मित्रपक्षांचा विचार करत काही जागांवर माघार घेतल्याचे चित्र आहे. महायुतीतील समन्वय टिकवून ठेवण्यासाठी भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला काही महत्त्वाच्या जागा दिल्या आहेत. त्यामुळे जागावाटपात भाजपने वर्चस्व राखत असतानाच मित्रपक्षांनाही योग्य प्रतिनिधित्व दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनेही आपले उमेदवार जाहिर केले आहे. त्यामुळे निवडणूक चांगलीच रंगतदार होणार आहे. या निवडणुकीच्या संदर्भातील लाईव्ह अपडेट्स येथे पहा….
Source link
विधान परिषद निवडणूक 2026:उमेदवारी अर्जाचा अखेरचा दिवस; महायुतीत भाजपचे वर्चस्व, शिवसेना-राष्ट्रवादीलाही संधी, आघडीचेही उमेदवार मैदानात