![]()
वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव परिसरात तब्बल 22 तासांपासून वीज गायब आहे. तालुक्याला रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब आडवे पडलेत. तारा तुटल्यात. नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर आडवी पडलेली झाडे अजूनही हाटवण्यात आली नाहीत. दुसरीकडे अवकाळी पावसामुळे 1 बैल 2 गायींचा मृत्यू झालाय. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, तर घरावरील पत्रेही उडालेत. बोर दहेगावसह पालखेड, परसोडा, गोळवाडी, बेंदवाडी,कारंजगाव येथे हे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शिवराई ३३ के.व्ही. वरील सर्व गावांची वीज गुल झाली आहे. सोमवार सकाळपासून महावितरण कर्मचारी, वायरमनची टीम युद्ध पातळीवर वीज पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण त्यांना अजून यश आलेले नाही. महावितरणने मान्सूनपूर्व कामे केली असती, विद्युत तारेला व खांबाला अडचण करणारे झाडे काढली असती, तर ही वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. बोर दहेगाव परिसराला रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. आता आज सोमवारी त्याच्या नुकसानीचे स्वरूप समोर आले आहे. तालुक्यात रविवारी सायंकाळी सहाच्या नंतर अनेक ठिकाणी पाऊस झाला. त्यात सोसाट्याचा वाराही होता. त्यामुळे मोठ मोठी झाडे उन्मळून पडली. महालगाव येथे गट नंबर ३०२ मध्ये वीज पडून पुंजाराम आल्हाट यांचा एक बैल व दोन गायींचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बोर दहेगाव शेड फाटा ते पालखेड रोडवर झाडे पडल्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. शिवराई जवळ महामार्गांवर झाड पडल्यामुळे काही वेळ वाहतूक बंद होती. स्थानिकच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. बोर दहेगावजवळ राष्ट्रीय महामार्गांवर बाभळीचे मोठे झाड आडवे पडल्यामुळे NH 752-I नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक तीन तास ठप्प होती. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूने दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बोर दहेगाव येथील तरुणांनी व दादासाहेब पाटील कृषी महाविद्याल्याच्या तरुणांनी एकत्र येत महामार्गांवरील बाभळीचे झाड हटवले. त्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली.
Source link
वैजापूर तालुक्याला अवकाळी तडाखा:पावसामुळे 1 बैल 2 गायींचा मृत्यू, झाडे उन्मळून पडली; बोर दहेगाव परिसरात 22 तासांपासून वीज गायब