Headlines

खडकनारळात अंमलदार कीर्तिकर यांचा सत्कार:पोलिस महासंचालक पदक मिळाल्याने गौरव‎




प्रतिनिधी | लासुरस्टेशन खडकनारळा ता.गंगापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने नुकतेच पोलीस महासंचालक पदक मिळाल्याने शिल्लेगाव पोलीस ठाण्यातील लासुरचे बीट अंमलदार रवीकुमार कीर्तीकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी बीट अंमलदार रवीकुमार कीर्तीकर यांनी सांगितले की, मला मिळालेले पोलीस महासंचालक पदक हा माझा एकट्याचा सन्मान नसून हा सर्व पोलीस दलाचा सन्मानआहे. गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या पावसाळ्यात सामाजिक बांधिलकी जपून शक्य होतील तेवढे वृक्ष लागवड करावी असे आवाहनही केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस पाटील समाधान मुंजाळ यांनी केले. यावेळी सरपंच चंद्रभागाबाई थोरात, उपसरपंच रंगुबाई मुंजाळ, ग्रामपंचायत सदस्य माधुरी जाधव, लैला शहा, मनीषा थोरात, पंडित थोरात, विधीतज्ञ वाल्मिक मुंजाळ, माजी सरपंच शांताराम मुंजाळ, माजी उपसरपंच नसीर शहा, ग्रामरोजगार सेवक राहुल जाधव, शालेय समितीचे अध्यक्ष राहुल मुंजाळ, प्रफुल मुंजाळ, माजी ग्रा.प सदस्य कचरू दिवेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. खडकनारळा ग्रामपंचायतीच्या वतीने बीट अंमलदार कीर्तिकर यांचा गौरव.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *