![]()
प्रतिनिधी | पैठण अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पैठण तालुकास्तरीय जन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक वैभव, शैक्षणिक प्रोत्साहन यांचा सुंदर संगम घडवून आणणारे विविध उपक्रम राबविण्यात आले. दिवसभर झालेल्या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन केले. जयंती उत्सवाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर चौकातील पुतळ्याच्या अभिषेक व पूजनाने झाली. नामदेव महाराज पोकळे, दुर्गाताई पोकळे तसेच बाबासाहेब गेणुजी शिंदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर शहरातून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. अहिल्यादेवी चौकातून सुरू झालेली ही रॅली महावीर चौक, जिजाऊ चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराणा प्रताप चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व खंडोबा मंदिर मार्गे अहिल्यादेवी होळकर स्मारकापर्यंत पोहोचली. स्मारक परिसरात अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिबा यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नगराध्यक्षा विद्या कावसानकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, जिल्हा परिषद सदस्य पोपट औटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अहिल्यादेवी होळकर पुरस्कारप्राप्त अश्विनीताई लखमले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने पैठणी विणकर ज्योती सरगर, आदर्श शिक्षिका गलांडे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दहा महिलांचा गौरव करण्यात आला. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा गलांडे व महेश साखरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्याध्यक्ष अंकुश काळे, उपाध्यक्ष सुनील वीर, महादेव खंडागळे, सचिव जिजा मिसाळ, जगदीश वीर, संतोष धापटे, विष्णू सुडके, योगेश पाचे, राजेंद्र वाघमोडे, बंडू महाराज पाचे, मिठू नन्नावरे, भाऊसाहेब कोल्हे यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष डॉ. भारत झारगड यांनी उपस्थितांचे आभार मानले. अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर, गुणवंतांचा गौरव, महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान अशा विविधांगी उपक्रमांमुळे यंदाची जयंती पैठणकरांसाठी संस्मरणीय ठरली. पोवाडा, भजन, कोळीगीतांचे सादरीकरण अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांना महाराष्ट्राच्या लोकपरंपरेची समृद्ध झलक अनुभवायला मिळाली. दिलीप खंडेराय दिग्दर्शित या कार्यक्रमात पोवाडा, भजन, गवळण आणि कोळीगीतांच्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांतून प्रेरणा मिळते Ãअहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक योगदान आजही महिलांसाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या विचारातून नवीन प्रेरणा मिळते. पैठण शहरात त्यांचा पुतळा उभारुन नवीन पिढीसाठी आदर्श ठेवला आहे. – संदिपान भुमरे , खासदार, छत्रपती संभाजीनगर पैठण येथे झालेल्या अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कार्यक्रमात कलाकारांनी पारंपरिक कलेचे सादरीकरण केले. तसेच यात दहावी व बारावीत उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा खासदार संदिपान भुमरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Source link
पैठणला महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन, पारंपरिक लोककलेचा अभूतपूर्व उत्साह:गुणवंत विद्यार्थी; विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान