![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता एकूण 23 उमेदवार रिंगणात उरले असून, या निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक सरळ झाली आहे. विशेष म्हणजे या 23 उमेदवारांपैकी केवळ 10 उमेदवार बारामती मतदारसंघातील आहेत, तर उर्वरित 13 उमेदवार बाहेरील भागातील आहेत. सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि पुणे या भागांतून आलेले उमेदवारही या लढतीत उतरले आहेत. या निवडणुकीत महत्त्वाचा टप्पा ठरला तो काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांच्या माघारीचा. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आकाश मोरे हे सुनेत्रा पवार यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करू शकतील, अशी चर्चा होती. बारामतीत धनगर समाजाची मतसंख्या लक्षणीय असल्याने त्यांच्या उमेदवारीमुळे मताधिक्य कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा दिलासा मिळाला आहे. बारामतीत अजित पवार यांनी नेहमीच मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीतही सुनेत्रा पवार यांना दणदणीत विजय मिळवून देणे, ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची बाब बनली आहे. यासाठी पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्यांनी सक्रिय भूमिका घेतली. अखेर काँग्रेसला माघार घ्यायला राजी करण्यात यश आले आणि त्यामुळे निवडणुकीतील मुख्य स्पर्धा कमी झाल्याचे चित्र आहे. आता या निवडणुकीत चर्चेत राहू शकतील अशी दोनच नावे पुढे येत आहेत, ती म्हणजे अभिजित बिचुकले आणि करुणा शर्मा मुंडे. मात्र हे दोघेही बारामतीबाहेरील असल्याने ते प्रत्यक्षात कितपत प्रभाव टाकू शकतील, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर सध्या कोणतेही ठोस आव्हान नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया 23 एप्रिल रोजी पार पडणार आहे, तर निकाल 4 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीत उरलेल्या उमेदवारांची यादी पाहिली असता विविध भागांतील आणि विविध पार्श्वभूमी असलेले उमेदवार रिंगणात असल्याचे दिसते. त्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता पूर्णपणे संपलेली नाही. खरी लढत कोण देणार, याकडे सर्वांचे लक्ष उमेदवारांच्या यादीत प्रमुख नाव म्हणून सुनेत्रा अजित पवार (बारामती, राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ) यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे उमेदवारांची संख्या मोठी असली तरी खरी लढत कोण देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
बारामतीत 23 उमेदवार रिंगणात:काँग्रेसच्या माघारीनंतर लढत एकतर्फी? 30 जणांनी घेतली माघार; आता कोण टक्कर देणार, वाचा नावे