![]()
तालुक्यातील मक्रणपूर व रेल ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यास ४० हजारांची रोख लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहाथ पकडले. विलास पिराजीराव जोंधळे (५०) असे लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार किशोर वाळुंजे यांनी नवबौद्ध घटक परिसर विकास योजनेअंतर्गत आंबेडकरनगर येथे ५ लाख आणि कन्नड साखर कारखाना परिसरातील गौतमनगर, अण्णाभाऊ साठेनगर येथे ५ लाख रुपयांचे पीव्हीआर ब्लॉक बसवण्याचे काम केले होते. हे काम पूर्ण होऊन दोन महिने झाले तरी ग्रामविकास अधिकारी जोंधळे हे त्यांचे अंतिम बिल काढण्यास टाळाटाळ करत होते. बिल मंजूर करण्यासाठी जोंधळे यांनी एकूण रकमेच्या ५ टक्के कमिशन म्हणून ४० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने दुपारी मक्रणपूर ग्रामपंचायत कार्यालयात सापळा रचला. आरोपी जोंधळेच्या अंगझडतीत आढळलेला मोबाइल पथकाने जप्त केला. या प्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जोंधळेस ४५ हजार पगार मक्रणपूर व रेल ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी असलेल्या विलास जोंधळे यास ४५ हजार पगार असून, तक्रारदाराने केलेल्या कामाच्या ५ टक्के रक्कम कमीशन म्हणून देण्याची मागणी त्याने केली होती. मात्र, तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्याने पथकाने त्यास ग्रामपंचायत कार्यालयातच रंगेहाथ पकडत अटक केली आहे.
Source link
मक्रणपूरचा ग्रामविकास अधिकारी 40 हजारांची लाच घेताना जाळ्यात:5 टक्के कमिशनची मागणी, एसीबीची ग्रामपंचायत कार्यालयात कारवाई