Headlines

तेलवाडी येथे वारकरी स्नेहसंमेलन‎:समाजात समता, शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे : गोपाल महाराज




समाजात सद्भाव समता आणि शांतता नांदावी यासाठी संतांचे जीवित कार्य आहे. आज युवकात व्यसनाधीनता वाढत आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने संत शिकवण समजून घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन संत लक्ष्मण चैतन्य आश्रम तेलवाडी येथे गोपाल चैतन्य महाराज यांनी केले. आमदार संजना जाधव यांच्या पुढाकारातून तालुक्यातील १३० संत, महंत कीर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी संत चैतन्य महाराज आश्रमाचे प्रमुख गोपाल चैतन्य महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रास्ताविक करताना सर्व चैतन्य सचिन महाराज म्हणाले की, समाजात प्रश्न वाढत आहेत, चिंता वाढत आहेत. अशा पार्श्वभूमीवर संतांचे मार्गदर्शन दिशादर्शक ठरते. प्रत्येकाने एक झाड लावले तर पर्यावरणाचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. या वेळी आमदार संजना जाधव यांनी सांगितले की, संत, महंत, कीर्तनकार प्रबोधनकार, वारकरी हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. त्यांचे योगदान लक्षात घेऊन हे संत स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उद्धव महाराज, रामेश्वर महाराज, विनोद महाराज, गणेश महाराज, आढाव महाराज चिंचखेडा, संतोष महाराज, अकोलकर महाराज, अशोक महाराज आदींसह तालुक्यातील १३० संत मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमास तेलवाडीचे सरपंच उत्तमराव राठोड, ज्ञानेश्वर निकम, साईनाथ आल्हाड,आकाश बोलधने,अशोक वाळुंजे, अप्पाराव घुगे, बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड, जयेश बोरसे, सिद्धेश्वर झाल्टे, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, कल्याण पवार, आप्पाराव घुगे, काकासाहेब कवडे,किशोर पवार, रत्नाकर पंडित, राम पवार, संतोष राजेजाधव, केशव राठोड, रामेश्वर घनकर, राजू मोकासे, अशोक वाहूळ, दिलीप नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास मनगटे, नवनीत राठोड, गोकुळ राठोड, आदित्य गर्जे, जयराम जाधव आदींसह मोठ्या संख्येने तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक, कीर्तनकार, वारकरी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे आभार सचिन महाराज यांनी मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *