Headlines

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेत 43 अर्ज अवैध:संजना जाधव, समीर सत्तार, अण्णासाहेब माने यांचे अर्ज बाद, अब्दुल सत्तारांना मोठा झटका




700 कोटींची उलाढाल असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आले आहेत. मनपा, जिल्हा परिषद गमावल्यानंतर शिवसेनेने निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच कारणामुळे पालकमंत्री शिरसाट रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. यातच शिवसेनेच्या आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. यामुळे यावसेनेला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया नुकतीच पार पडली. या छाननीमध्ये एकूण 43 उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये आमदार संजना जाधव, अब्दुल समीर सत्तार आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या अर्जांचा समावेश आहे. उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांवर निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांनी सोमवारी सुनावणी घेतली. या सुनावणीनंतरच अवैध अर्जांवर अंतिम निर्णय घेण्यात आला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या निवडणुकीत अनेक राजकीय दिग्गज रिंगणात उतरले आहेत. यामध्ये विद्यमान आमदार, माजी आमदार, माजी अध्यक्षांच्या पत्नी तसेच इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचा समावेश आहे, ज्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयानुसार, माजी आमदार अण्णासाहेब माने, आमदार संजना जाधव, अब्दुल समीर सत्तार आणि सुवर्णा जाधव यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. ग्रामीण मतदारांवर ताबा मिळवण्यासाठी डाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही केवळ एक वित्तीय संस्था नसून जिल्ह्याच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. बँकेच्या माध्यमातून दरवर्षी साधारणतः 700 कोटीचे कर्ज वाटप केले जाते. या कर्ज पुरवठ्याचा थेट लाभ जिल्ह्यातील 1 लाख शेतकऱ्यांना होतो. ग्रामीण भागातील शेती, विकास सोसायट्या आणि पर्यायाने संपूर्ण अर्थकारण या बँकेच्या तिजोरीशी जोडलेले आहे. ज्या नेत्याचे किंवा पक्षाचे या बँकेवर वर्चस्व असते, त्याचा ग्रामीण मतदारांवर ताबा मिळतो. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या गणितांमध्ये जिल्हा बँकेची कामगिरी अत्यंत निर्णायक ठरते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *