![]()
लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. विजेच्या तडाख्यात एक बैल दगावल्यानंतर दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने त्यांनी आपल्या पत्नी औसाबाई यांना नांगराला जुंपून शेताची नांगरणी केल्याचे या व्हिडिओत दिसून आले होते. या घटनेमुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक मदतीचे निर्देश दिले. मुख्यमंत्र्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जवळच्या गोशाळेतून शेतकऱ्याला नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने बैल खरेदी करता यावा यासाठी ३२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. पत्नीच्या मदतीने नांगरणी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट कोसळले होते. शेतातील मशागतीची कामे सुरू असताना वादळी वाऱ्यासह पाऊस आणि विजांचा कडकडाट झाला. यावेळी वीज कोसळून त्यांच्या दोन बैलांपैकी एक बैल जागीच ठार झाला. शेतीचा मुख्य आधारच हिरावल्याने गायकवाड कुटुंब अडचणीत आले. दुसरा बैल खरेदी करण्यासाठी आवश्यक पैसे नसल्याने त्यांनी पत्नीच्या मदतीने नांगरणी करण्याचा निर्णय घेतला होता. अंबादास दानवे, रोहित पवारांनी तातडीने मदतीची मागणी केली होती हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीका केली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही या कुटुंबाला तातडीने मदत करण्याची मागणी केली होती.
मुंबई-पुणे महापौर कार्यालय उडवून देऊ: ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी, संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा वाढवली, सायबर विभागाकडून तांत्रिक तपास सुरू मुंबई-पुण्याचे महापौर कार्यालय आणि नागपूरमधील संघ मुख्यालय आयईडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. अधिकृत ई-मेलवर आलेल्या या धमकीनंतर पोलिस यंत्रणा आणि सायबर विभाग हायअलर्टवर आले असून, संवेदनशील भागांत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. सविस्तर वाचा
Source link
पत्नीला नांगराला जुंपल्याचा व्हिडिओ व्हायरल:विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्याला मदतीचा हात, नांगरणीसाठी बैल, 32 हजारांचे अनुदानही मंजूर