![]()
आर्णी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ब्राह्मणवाडा, मसोला येथील शेतशिवारात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्रीच्या अड्ड्यांवर आर्णी पोलिसांनी बुधवार दि. १० जून रोजी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दोन आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सकाळच्या सुमारास ब्राह्मणवाडा, मसोला परिसरात अवैधरित्या गावठी हातभट्टीद्वारे दारूची निर्मिती व विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून दोन्ही ठिकाणी छापेमारी केली. ब्राह्मणवाडा तांडा येथील पारिबाई मोहन पवार (वय ५८) यांच्या राहत्या घरात सुरू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी एका लोखंडी टाकीत अंदाजे १०० लिटर मोहफुलाचा सडवा, सहा ड्रममध्ये प्रत्येकी ८० लिटरप्रमाणे ४८० लिटर सडवा, दारू गाळण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रम, टोपले, डबके, तुरटी, गूळ व इतर साहित्य आढळून आले. याशिवाय प्लास्टिकच्या डबक्यात २० लिटर गावठी हातभट्टी दारू सापडली. हे सर्व साहित्य सुमारे २४ हजार ३०० रुपये किमतीचे जप्त करण्यात आले. दुसऱ्या कारवाईत मनोज पांडुरंग शेंद्रे (वय ४५, रा. मसोला) यांच्या शेतात सुरू असलेल्या हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही कारवायांमध्ये मिळून ४० हजार ५०० रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून अवैध गावठी दारू विक्री विरोधात पोलिसांनी चांगलीच कंबर कसली असून, अनेक ठिकाणी धाडी टाकून गावठी दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारे साहित्य पोलिसांकडून नष्ट करण्यात येत असून, संबंधित व्यक्तींवर कडक स्वरुपात कारवाई देखील करण्याचा धडाका सुरूच आहे. त्यामुळे अवैध गावठी दारू तयार करणाऱ्यांचे धाबे दणानले असल्याचे दिसून येत आहेत. दारूभट्ट्यावर कारवाई करून मोह सडवा नष्ट करताना पोलिसांचे पथक. यांनी केली कारवाई ही कारवाई पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे, उपनिरीक्षक दिलीप गिरी, नंदकिशोर घुगे, कैलास देवकर, मिलिंद धाडवे यांनी केली. दिग्रस पोलिसांच्या या आक्रमक मोहिमेमुळे अवैध हातभट्टी व्यवसायाला मोठा धक्का बसला असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले. आरंभी परिसरात अवैध हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी तब्बल १,३०० लिटर मोहफुलाचा सडवा जप्त करून जागेवरच नष्ट केला. या सलग दोन धडक कारवायांमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पहिली कारवाई आज दि. १० जून रोजी सकाळी ६.२० वाजता मौजे आरंभी येथे ललिताबाई रमेश जाधव यांच्या घरी करण्यात आली. या छाप्यात ३०० लिटर मोहफुलाचा सडवा अंदाजे किंमत १५ हजार रुपये जप्त करण्यात आला. आवश्यक नमुने घेऊन संपूर्ण सडवा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे. यानंतर सकाळी ७.२० वाजता आरंभी शेतशिवारात अमित सुभाष राठोड व त्याचा भाऊ जीवन राठोड यांच्या शेतातील हातभट्टीवर दुसरी प्रोव्हिबिशन रेड करण्यात आली. या कारवाईत १,००० लिटर मोहफुलाचा सडवा अंदाजे किंमत ५० हजार रुपये जप्त करण्यात आला. सॅम्पल घेतल्यानंतर हा सडवाही नष्ट केला.
Source link
ब्राह्मणवाडा, मसोला येथील अवैध हातभट्टीचा 480 लिटर सडवा नष्ट:40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त, दोन जणांविरोधात गुन्हे दाखल