Headlines

Rohit Pawar Aggressive on Pandharpur Farmer Protest


पंढरपुरात होणाऱ्या शेतकरी आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार रोहित पवार यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. पंढरपुरातील अन्नदात्याग आंदोलन अवघ्या ३६ तासांवर आले असताना प्रशासनाने वाहतुकीचा प्

.

रोहित पवार म्हणाले की, आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने होणार असून वारकरी आणि भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून नामदेव पायरीऐवजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका कोपऱ्यात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. “या आंदोलनस्थळी कोणतीही वाहनांची गर्दी होणार नाही. हे अन्नत्याग आंदोलन आहे, त्यामुळे कायदा-सुव्यवस्था किंवा ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी, शेतीमालाच्या दरांच्या प्रश्नांवरून संतप्त आहेत. राज्यातील विविध भागांत शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यापूर्वीही पंढरपुरात वारकरी आणि शेतकरी संघटनांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागले आहे.

रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत म्हटले, “प्रशासनाने आमची अडवणूक करण्यापेक्षा शेतकऱ्यांमधील संताप सरकारपर्यंत पोहोचवावा.” त्यांनी पुढे इशारा दिला की, “परवानगी दिली तरी आणि नाही दिली तरी आंदोलन होणारच. कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.”

रोहित पवारांची ट्विटर एक्सवरील पोस्ट..

‘कॉकरोच जनता पार्टी’चा आज पुण्यात एल्गार:दिल्लीतील आंदोलनानंतर आता धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार विद्यार्थी

दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आता पुण्यात आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.