Headlines

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का!:विधानपरिषदेच्या तोंडावर 3 आमदार महायुतीच्या गळाला? बैठकीला उपस्थित!




विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, मतदानाची तारीख जशी जवळ येत आहे, तसा महायुतीला मिळणारा पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याच निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या स्थानिक नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र, विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तीन आमदार, माढ्याचे अभिजीत पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर आणि करमाळ्याचे नारायण पाटील, या महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, येथे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या बैठकीला चक्क शरद पवार गटाचेच आमदार उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीला माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी हजेरी लावली आहे. धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडले भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा थेट सामना असतानाही, स्वतःच्याच पक्षाच्या आमदारांचा कल भाजपला पाठिंबा देण्याकडे असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. यामुळे धैर्यशील मोहिते पाटील एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या चारपैकी तब्बल तीन आमदारांनी महायुतीच्या बैठकीला उपस्थिती दर्शवली असून, केवळ मोहोळचे आमदार राजू खरे हे एकमेव आमदार या बैठकीकडे फिरकले नाहीत. शरद पवार गटाच्या चार पैकी तीन आमदारांचा महायुतीला पाठिंबा? या बैठकीला शिवसेना शिंदे गटातर्फे खासदार ज्योती वाघमारे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून नाराज असलेले शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील व उत्तमराव जानकर यांनी आज थेट भाजप महायुतीच्या बैठकीला हजेरी लावली आहे. तर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी याआधीच महायुतीच्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला असून तेदेखील या बैठकीत सहभागी झाले आहेत. परिणामी, सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या चारपैकी तब्बल तीन आमदारांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने, आगामी सोलापूर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पारडे लक्षणीयरीत्या जड झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे नाराज आमदार रवींद्र चव्हाणांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. त्यातच आता सोलापुरात महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू असताना, शरद पवार गटाचे हे नाराज आमदार थेट भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या या उघड नाराजीचा आणि आमदारांच्या बंडाळीचा मोठा फटका आगामी विधानपरिषद निवडणुकीत शरद पवार गटाला बसण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *