Headlines

छत्रपती संभाजीनगरात धक्कादायक प्रकार:पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या 17 वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण, VIDEO




छत्रपती संभाजीनगरमधील भारत करिअर अकॅडमीमध्ये पोलिस भरतीची पूर्वतयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अकॅडमीचे पी.टी. प्रशिक्षक आणि व्यवस्थापक विवेक डाकणे याने क्षुल्लक कारणावरून या विद्यार्थ्याला बेल्ट आणि काठीने अमानुषपणे मारहाण केली. या घटनेत विद्यार्थ्याचा केवळ शारीरिकच नव्हे, तर रॅगिंगसारखा प्रकार करत मोठा मानसिक छळही करण्यात आला आहे. करिअर घडवण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या विद्यार्थ्यावर शिक्षण देणाऱ्या संस्थेतच झालेल्या या निर्दयी अत्याचाराची माहिती समोर आल्यानंतर, विद्यार्थ्याच्या पालकांसह नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेल्ट आणि काठीने मारहाण या धक्कादायक मारहाणीचा संपूर्ण थरार अकॅडमीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे फुटेज आता समोर आले असून, त्यामध्ये प्रशिक्षक डाकणे या विद्यार्थ्याला क्रूरपणे बेल्ट आणि काठीने मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे. याच सीसीटीव्ही पुराव्याच्या आधारे आता पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. आरोपीवर गुन्हा दाखल, कठोर कारवाईची मागणी मारहाणीच्या या प्रकारानंतर पीडित विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. या फिर्यादीवरून छावणी पोलिस ठाण्यात विवेक डाकणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य ओळखून छावणी पोलिसांनी आता सखोल चौकशी सुरू केली असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *