Headlines

पार्वतीनगर 'डक फूट बेन्ड' दुरुस्ती अंतिम टप्प्यात:आज सकाळी चाचणी, उद्यापासून पाणीपुरवठा पूर्ववत




अमरावती येथील पार्वतीनगर परिसरातील नागरिकांना लवकरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. जलकुंभाच्या ‘डक फूट बेन्ड’ दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून, आज (गुरुवारी) काही प्रमाणात तर उद्या (शुक्रवारी) पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या दोन दिवसांपासून ‘डक फूट बेन्ड’ला गळती लागल्यामुळे या भागातील पाणीपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्तीचे काम काल (बुधवारी) मध्यरात्रीपर्यंत पूर्ण झाले असून, त्यावर टाकलेले काँक्रीट रात्रभर वाळवण्यात आले. आज सकाळी त्याची चाचणी घेण्यात येणार आहे. या जलवाहिनीशी सुमारे २५ हजार लोकवस्ती जोडलेली आहे. सोमवारपासून पाणीपुरवठा बंद असल्याने पार्वतीनगर, वल्लभनगर, छाया कॉलनी, आनंदनगर, गडगडेश्वर यासह परिसरातील नागरिकांना तीन दिवस पाण्याविना काढावे लागले. मजीप्राचे उपविभागीय अभियंता संजय लेवरकर यांनी सांगितले की, पाऊस किंवा वादळामुळे कोणताही व्यत्यय न आल्यास दुरुस्ती कार्य पूर्ण झाले आहे. त्यानुसार, आज (गुरुवारी) काही प्रमाणात आणि उद्या (शुक्रवारी) नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल. या अचानक उद्भवलेल्या बिघाडामुळे अनेक नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. काहींनी साठवलेल्या पाण्याचा वापर केला, तर काहींनी पर्यायी व्यवस्थेद्वारे पाण्याची सोय केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *