Headlines

ओमराजेंची Y+ सुरक्षा हे लोकांच्या रोषाचे प्रतीक:हा चक्रव्यूह कसा भेदणार? सुषमा अंधारेंचा निंबाळकर आणि नागेश आष्टीकरांवर घणाघात




शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत बोलताना म्हटले आहे की, ओमराजे यांनी 20 वर्षे न्यायासाठी लढा दिला, पण काही घडामोडींमुळे किंवा मांडणी कमी पडल्याने त्यांना न्याय मिळू शकला नाही. तरीही आमच्या भावना आणि सदिच्छा त्यांच्यासोबत आहेत. मात्र, दिल्लीला जाऊन सह्या करून आल्यावर मेळावा घेण्याऐवजी त्यांनी तो दिल्लीला जाण्यापूर्वीच घ्यायला हवा होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच, ओमराजेंची सध्याची स्थिती मानसिक अस्थिरतेची असल्याचे सांगत, त्यांनी घेतलेली Y+ सुरक्षा हे लोकांच्या त्यांच्यावर असलेल्या रोषाचेच प्रतीक असल्याचे अंधारे म्हणाल्या. त्यामुळे आता लोक चिडलेले असताना ओमराजे हा चक्रव्यूह कसा भेदणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, नागेश आष्टीकर यांच्या सारख्या लोकांची आर्थिक कोंडी झाली आहे. निधीबाबत राजाभाऊ, अरविंद सावंत अनेक काँग्रेस आमदार खासदार यांचे सुद्धा मत आहे. औंढा नागनाथ स्मरून तुम्हाला वाटते का? दिल्लीत झालेल्या बैठकीत कोण कोण होतं हे आम्हाला माहिती आहे. 10 तारखेला झालेल्या बैठकीनंतर ताजमध्ये 6 जणांची बैठक झाली याचे सगळे व्हिडिओ आहेत. आष्टीकर यांनी दिलेली कारणे तकलादू आहेत. मान मिळत नव्हता मग उमेदवारी कशी मिळाली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सभापतींसोबत हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे व्हिडिओ सुषमा अंधारे यांनी लोकसभा सभापतींसोबत हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीचे व्हिडिओ उपलब्ध असल्याची माहिती देत, हा निर्णय गेल्या चार महिन्यांपासून शिजत असल्याचा दावा केला आहे. तसेच, खासदार संजय दिना पाटील यांची कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असली तरी, या लोकांवर आपला अजिबात विश्वास नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘त्यांची मुले आमच्यासोबत राहतील यावर विश्वास तरी कसा ठेवायचा?’ असा सवाल उपस्थित करत, खासदारांची मुले आमच्या पाठीशी आहेत, अशा कोणत्याही भ्रमात आम्ही नसल्याचेही अंधारे यांनी ठणकावून सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *