![]()
हॉटेलवर बसलेल्या एकास अनैतिक संबंधातून मारहाण होत असताना भांडण सोडविण्यास गेलेल्या हॉटेल चालकास तूमध्ये पडू नको, म्हणत चाकूने भोसकून खूनकेल्याची घटनाकदमवाडी व टाकळी फाटा दरम्यान घडली. विलास नवनाथ घुले (वय२५, रा. टाकळी, ता. केज) असेखून झालेल्या तरुणाचे नाव आहे. टाकळी (ता. केज) येथील मृतविलास घुले व आकाश चाळक हेभागीदारीमध्ये हॉटेल चालवीत होते.२० जून रोजी कदमवाडी फाटायेथून जीपमधून बाबासाहेब कदम,त्याचा भाऊ मंगेश कदम,बाबासाहेब कदम याचा सासरारामेश्वर गायकवाड हॉटेलमध्ये आले. ते हॉटेलमध्ये बसलेल्याउमेश माने यांच्याजवळ आले. बाबासाहेब कदम हा उमेश मानेयास तुझा मर्डरच करतो, असेबोलत उमेश माने यास मारहाणकरण्यास सुरुवात केली. उमेश मानेहा केजच्या दिशेने पळाला. त्यालावाचवण्यासाठी नितीन घुले वविलास घुले त्याच्या पाठीमागे पळाले. याचवेळी रामेश्वर गायकवाड (रा. सोनीजवळा) यानेचाकू विलास घुले याच्या पोटातखुपसला . ९ जणांवर केजपोलिसात गुन्हा दाखल करण्याचीप्रक्रिया सुरू होती. भांडणसोडविण्यासाठी गेलेल्याचाआरोपींनी चाकुने भोसकून खुनकेला. केज ठाण्यात गुन्हा दाखलअसून, संतप्त नातेवाइकांनी केजमध्ये रास्ता रोको केला.
Source link
भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या हॉटेलचालक तरुणाचा चाकूने भोसकून खून:केज तालुक्यातील कदमवाडी-टाकळी फाटादरम्यान घडली घटना