Headlines

“बॅडमिंटन’ छंद म्हणून जोपासला तर अनेक खेळाडू तयार होतील:जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे; विधी सैनी व राजवीर कुक्कडवाल यांना विजेतेपद‎



बॅडमिंटन खेळत असताना राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळविणे हा हेतू न ठेवता खेळाडूंनी बॅडमिंटन खेळ हा छंद म्हणून जोपासावा. राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनेक खेळाडू हा खेळ सोडून जातात. त्यामुळे महाराष्ट्राला व देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळ

.

वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉलमध्ये नगर डिस्टिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने जी एच रायसोनी मेमोरियल जिल्हा अजिंक्यपद व जिल्हा निवड चाचणी स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी रायसोनी कॉलेजचे प्राचार्य एच. आर. कुलकर्णी, नगर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव मिलिंद कुलकर्णी, खजिनदार राहुल मोटे, सदस्य डॉ. भूषण अनुभुले, चेतन बोगावत उपस्थित होते.मिलिंद कुलकर्णी म्हणाले, अ.नगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने खेळाडूंसाठी नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. नवोदित खेळाडू तयार व्हावे. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश ठेवून असोसिएशनचे कार्य सुरू आहे. या स्पर्धेला खेळाडूंनी मोठा प्रतिसाद दिला आहे. तसेच या स्पर्धेसाठी रायसोनी मेमोरियल फाउंडेशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे विशेष सहकार्य मिळत असते.

या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुली दुहेरी विजेते-अनन्या सोले व भूमी डागा, उपविजेते-राशी सोनी मंडलेचा व यशवी चंगेडे, मुले दुहेरी विजेते-नील पितळे व राजवीर कुक्कडवाल, उपविजेते-निहार दळे व रामचरण गोंगडा, एकेरी मुली विजेते-विधी सैनी, भूमी डागा, एकेरी मुले विजेते -राजवीर कुक्कडवाल, उपविजेते-नील पितळे. १७ वर्षांखालील दुहेरी मुली-विजेते भूमी डागा व साची आगरवाल, उपविजेते समृद्धी साबळे व सायली माने, दुहेरी मुले विजेते-आयान बैस व विराज गाडेकर, उपविजेते-मिथिलेश पवार व ऋषिकेश राणा, एकेरी मुली विजेते-विधी सैनी, उपविजेते-अनन्या सोले, मुले एकेरी विजेते-विराज गाडेकर, उपविजेते-आयन बैस.

१५ वर्षाखालील एकेरी मुली विजेते-विधी सैनी, उपविजेते-सायली माने, एकेरी मुले-विजेते विराज गाडेकर, उपविजेते-ऋषिकेश राणा. १३ वर्षाखालील एकेरी मुली विजेते-श्रावणी वीरकर, उपविजेते-गार्गी देवळालीकर, एकेरी मुले-विजेते-शर्विल काळे, उपविजेते-स्वरूप मांडे.

११ वर्षाखालील एकेरी मुली विजेते-विधी ठोंबरे, उपविजेते-सानवी आगरकर, एकेरी मुले विजेते-स्वरूप मांडे, उपविजेते-केयूर मांडे, खुला गट महिला दुहेरी विजेते-सायली माने व श्रद्धा मलिक, उपविजेते-सिद्धी शर्मा-यशवी चेंगेडे, पुरुष दुहेरी विजेते-अभिषेक बोराटे व राजवीर कुक्कडवाल, उपविजेते किरण वर्पे व जितेंद्र बिस्त. महिला एकेरी विजेते भव्या रसाळ, उपविजेते-श्रुती थोरात. पुरुष एकेरी विजेते-नील पितळे, उपविजेते-राजवीर कुक्कडवाल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *