Headlines

जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक बोरसे यांचा सत्कार:आमदार सुहास शिरसाठ, राजेंद्र पाथ्रीकर यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे‎




जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एक मोठी आणि अनपेक्षित राजकीय घडामोड समोर आली आहे. फुलंब्री तालुका मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार सुहास शिरसाठ यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते अनिल बोरसे यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाथ्रीकर यांनी अर्ज मागे घेतला आहे. या निवडणुकीसाठी फुलंब्री तालुक्यातून भाजपचे आमदार सुहास शिरसाठ व अनिल बोरसे यांचे अर्ज दाखल झाल्याने येथे चुरस निर्माण होईल असे चित्र होते. मात्र, सुहास शिरसाठ यांची नुकतीच विधान परिषदेवर आमदार म्हणून वर्णी लागल्याने पक्षीय पातळीवर आणि स्थानिक समीकरणांचा विचार करून त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. सुहास शिरसाठ यांनी आपला अर्ज अधिकृतपणे मागे घेतल्यामुळे अनिल बोरसे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. आमदार अनुराधा चव्हाण यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या मध्यस्थीमुळेच अनिल बोरसे हे बिनविरोध निवड झाल्याचे बोलले जात आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडीत माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरली आहे. अनिल बोरसे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याच्या पहिल्या दिवसापासून ते थेट आमदार सुहास शिरसाठ यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत किशोर बलांडे हे प्रत्येक टप्प्यावर अनिल बोरसे यांच्यासोबत खंबीरपणे उभे होते. या निवडीनंतर मंत्री अतुल सावे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुहास शिरसाठ, संजय खंबायते, रामराव शेळके यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख भाजप नेत्यांनी व महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बोरसे यांचे अभिनंदन केले.या निवडणुकीसाठी फुलंब्री तालुक्यातून भाजपचे आमदार सुहास शिरसाठ व अनिल बोरसे यांचे अर्ज दाखल झाल्याने येथे चुरस निर्माण होईल असे चित्र होते. भाजपच्या नवनिर्वाचित आमदार सुहास शिरसाठ यांनी माघार घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत अनिल बोरसे यांचे भाऊ संदीप बोरसे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. गणोरी गटातून आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला होता. आता संदीप बोरसे यांचे भाऊ अनिल बोरसे यांच्यासाठी भाजपच्या आमदाराने माघार घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केल्याने अनिल बोरसे आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? या चर्चेने तालुक्यात जोर धरला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *