![]()
शहरातील शशीविहार व सराफनगर परिसरात पावसाळ्यात पाईप नाला चोकअप झाल्यामुळे पावसाचे व सांडपाणी घरांमध्ये शिरण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे यांच्या निर्देशानंतर नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेत शशी विहार येथे नव्या मोठ्या पाईप नाल्याच्या कामास सुरुवात केली आहे. शशीविहार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात नाल्याचे पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष कावसानकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना तात्काळ सूचना देत काम सुरू करण्याचे आदेश दिले. नवीन मोठ्या क्षमतेचा पाईप नाला टाकण्यात येत असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होणार असून शशीविहार, सराफनगर परिसरातील पाणी तुंबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल असे नगराध्यक्ष कावसानकर यांनी सांगितले.
Source link
पाणी तुंबण्याची समस्या सुटली:शशीविहारमध्ये पाईप नाल्याच्या कामाला सुरूवात