Headlines

जामनेरला प्रियकरासोबत गेलेल्या विवाहितेवर वनात दाेघांचा अत्याचार:14 जण ताब्यात, व्हिडिओमुळे महिन्याने उघडकीस




प्रियकरासोबत जंगलात गेलेल्या विवाहित महिलेला धमकावत तिच्यावर दोघा तरुणांनी १३ मित्रांसमोर अत्याचार केला. काही मित्रांनी दोघांचे अत्याचार करतानाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. महिनाभराने हे उघडकीस आले. फत्तेपूर पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून १४ आरोपींना ताब्यात घेतले. ही घटना पळासखेडा काकर जंगलात घडली. एकाच वेळी तीन पथकांकडून धरपकड एखाद्या सामूहिक अत्याचार प्रकरणात जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर संशयित असलेले हा पहिलाच गुन्हा आहे. त्यातही जामनेर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेचच १५ पैकी १४ संशयितांना पकडले आहे. त्यासाठी स्थानिकसह एलसीबीच्या पोलिसांच्या मदतीने तीन टीम कार्यरत केल्या होत्या. या तीन टीमने १४ जणांना ताब्यात घेतले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *