- Marathi News
- National
- Good New Facilities For Devotees During Amarnath Yatra, Reach Srinagar Directly If Registered
बृजेंद्र सरवरिया2 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

यंदा अमरनाथ यात्रेसाठी आगाऊ नोंदणी नसलेल्या भाविकांना थेट जम्मूमधील ‘तवी रिव्हरफ्रंट’ या नव्या हबवर आधार कार्डद्वारे केवळ दोन दिवसांत नोंदणी करता येणार आहे. यंदा पहिल्यांदाच श्रीनगरचे ५ मजली हायटेक यात्री निवास आणि तवी रिव्हरफ्रंट ही दोन नवी आकर्षणे शिवभक्तांच्या स्वागतासाठी खुली होत आहेत. गर्दी वाढल्यास प्रशासनाची ३५ निवास केंद्रे सज्ज असून त्या ठिकाणी १५ हजार भाविक थांबू शकतील.
श्रीनगरचा पंथा चौक… सुसज्ज ५ मजली भक्तनिवास
नोंदणी करून पोहोचलेले भाविक थेट श्रीनगरच्या पंथा चौकातील नवीन ५ मजली यात्री निवासात पोहोचू शकतात. येथे त्यांना ‘थ्री-लेअर सिक्युरिटी’मधून जावे लागेल. याचे संचालक प्रदीप सिंह म्हणाले, ₹१,००० (जीएसटी वेगळा) मध्ये ७५ ‘थ्री-रूम बेड’ व ₹२०० प्रति व्यक्ती दराने १२ बेडच्या २० व १६ बेडच्या २३ डॉर्मिटरी आहेत. आपत्कालीन स्थितीसाठी ५ मोठे हॉल आहेत, जिथे ३,००० लोक थांबू शकतील. जुना पंथा चौक ट्रान्झिट कॅम्पही सुरू आहे. मेडिकल करून आलेल्या भाविकांना या ट्रान्झिट कॅम्पमध्ये दिवसभरात आरएफआयडी कार्ड बनेल.