Headlines

आता धक्के बसत नाहीत, पण आत्मपरीक्षणाची गरज:आदित्य ठाकरेंनी अहिरांना सर्व काही दिले, तरी समाधान नाही- संजय राऊत




आमच्या पक्षातून जे जे लोकं बाहेर पडले आहेत ते सर्व जण लाभार्थी आहेत. ज्यांना जास्तीत जास्त लाभ मिळाला असे लोकं आम्हाला सोडून जात आहेत. जे 6 खासदार आम्हाला सोडून गेले त्यामधील 5 जण हे काँग्रेसमधून आमच्याकडे आले होते. आमच्या सारख्याचा विरोध असताना त्यांना पदे देण्यात आली, आम्हाला माहिती होते हे जास्त काळ टिकणार नाही. राजकारणात माणसांची ओळख ही एका नजरेत व्हायला पाहिजे, असे म्हणत संजय राऊत यांनी स्वपक्षालाच टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले की, शिंदे हे सर्व गोळा करताना दमतील त्यावेळी त्यांना 5 फुट जागाच लागणार आहे. कुठे तरी थांबले पाहिजे हे ज्यांना कळत नाही त्यांचा अंत खूप वाईट होता. शिवसेनेच्या आंदोलनात अहिर कुठे होते? एकनाथ शिंदेंनी बेळगावच्या आंदोलनाचे फोटो दाखवावे. सचिन अहिर यांनी राजकीय भविष्यासाठीच शरद पवार यांना सोडले. शरद पवारांनी तर त्यांना धुळीतून उचलून शिखरावर बसवले होते. त्या काळात अहिर यांना राज्यमंत्रीपदी देणं खूप मोठी गोष्ट होती, ती शरद पवारांनी केली. त्यांनी शरद पवारांना सुद्धा बेसावध ठेवत शिवसेनेत आले. ते आमच्या पक्षाचे होतील कसे? सचिन अहिर यांच्या जाण्याने आम्हाला सर्वांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आता आम्हाला धक्के बसत नाहीत संजय राऊत म्हणाले की, शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या बळावर उभी आहे. आता असे कोणी जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाहीत. ते आम्ही बसून घेत नाही. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे नेते. ते असे म्हणू शकत नाही की मला कोणी भेटत नव्हते किंवा मला काही भेटले नाही. त्यांना रोजच आदित्य ठाकरे यांची भेट घेता येत होती. पुढच्या राजकीय वाटचालीसाठी पक्ष सोडावा लागतोय असे त्यांनी काही लोकांना म्हटले. झोपेत दगड टाकून जाण्याला इमान म्हणत नाही संजय राऊत म्हणाले की, सचिन अहिर यांचा सुनील शिंदे यांनी त्यांचा पराभव केला त्याच वेळी त्यांचे राजकारण संपले होते. आदित्य ठाकरे हे त्या मतदारसंघातून 2 वेळा आमदार झाले. या काळात आदित्य ठाकरेंनी सचिन अहिर यांना उपनेता, आमदार, पुणे जिल्हा ताब्यात दिला अजून काय दिले पाहिजे. इतकं सर्व काही देऊन सुद्धा समाधान मिळत नसेल तर काय करणार. झोपेत दगड टाकून जाण्याला इमान म्हणत नाही. उपसभापतीपद दिले आणि कुठेतरी उमेदवारी देतील, यापेक्षा जास्त तुम्हाला काय देणार. सचिन अहिर गेल्यामुळे वाईट वाटले त्यांनी असे काही करायला नको होते. व्यापाऱ्यांच्या पाठिंब्यावर फोडाफोडी संजय राऊत म्हणाले की, दिल्लीतील व्यापाऱ्यांचा पाठिंबा असल्याने एकनाथ शिंदेंकडून ही फोडाफोडी सुरू आहे. त्यांनी असे कार्यकर्ते फोडून दाखवावे की ज्यांना काहीच नकोय, मग असे हसून दाखवावे. राज्यात काय सुरू आहे. राज्याची वैचारिक दृष्टीने नासाडी सुरू आहे. राज्यातील काळा इतिहास लिहला जाईल त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचे नाव लिहिण्यात येईल. यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात असतानाच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सलग पोस्ट करत बंडखोर आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी पहिल्या पोस्टमध्ये सचिन अहिरांच्या पक्षांतराचा समाचार घेत एक शायरी शेअर केली. ते म्हणाले की, आम्ही चार किरणांचीही आस का धरावी? जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?या शायरीसोबतच त्यांनी पुढे स्पष्ट शब्दांत सुनावले की, पक्षात येतानाच जे स्वार्थ आणि बेईमानीचा कीडा घेऊन येतात त्यांच्या जाण्याचे दुःख का करावे?” तसेच बंडखोरांना टोला लगावताना त्यांनी लिहिले, बेईमान आदमी भी चाहता है उसके साथ के आदमी ईमानदार रहें ….. यही ईमानदारी की ताक़त है !!! अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटात गेलेल्या सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला आहे.
रामद्रोही म्हणत पंतप्रधान मोदींवर टीका राऊत यांनी राम मंदिराच्या कथित घोटाळ्यावरून त्यांनी केंद्र सरकार आणि मंदिर प्रशासनाला धारेवर धरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चंपत राय यांचा फोटो पोस्ट करत रामद्रोही असे संबोधले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *