जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात भरधाव कारच्या धडकेत एका तलाठ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. रस्त्याच्या कडेला उभे असताना भरधाव कारने त्यांना अक्षरशः चिरडले. या संपूर्ण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ
.
कार्यालयीन काम आटोपून घरी जाताना काळाचा घाला
मृत तलाठी दिगंबर कुरेवाड हे अंबड तालुक्यातील सज्जावर कार्यरत होते. कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले होते. जालना-मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात ते रस्त्याच्या कडेला उभे असतानाच भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
CCTVमध्ये कैद झाला अपघाताचा थरार
या भीषण अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. व्हिडिओमध्ये भरधाव कार क्षणार्धात येऊन तलाठ्याला उडवल्याचे दिसत असून अपघाताची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
कार चालकाविरोधात गुन्हा; तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण आणि चालकाचा वेग याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. या दुर्घटनेमुळे जालना शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा..
काळीज पिळवटणारा अपघात!:अकोल्यात भरधाव दुचाकीची चिमुकल्याला भीषण धडक; थरार CCTV मध्ये कैद

अकोला शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. शहरातील एका निवासी वसाहतीमध्ये भरधाव वेगाने येणाऱ्या एका दुचाकीने रस्त्यावरून जाणाऱ्या एका चिमुकल्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीच्या धडकेने मुलगा हवेत उडून रस्त्यावर जाऊन पडला. या अपघातात चिमुकला गंभीर जखमी झाला असून हा अंगावर काटा आणणारा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सविस्तर वाचा