Headlines

युद्धामुळे डिझेल दर भडकले; ट्रॅक्टर मशागतीच्या खर्चात 25 टक्के वाढ:लांबलेला पाऊस, वाढत्या खर्चामुळे 60% शेतकऱ्यांनी मशागतच केली नाही सुरू




अमेरिका – इराण युद्धामुळे इंधनाचे दर वाढल्याने डिझेलच्या किमतीत थेट १० टक्क्यांनी वाढ झाली. ३ महिन्यापूर्वी ९०.७६ रुपये प्रतिलिटर असणारे डिझेल जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे ९८.५६ रुपयावर पोहोचले. डिझेलमधील या दरवाढीचा थेट परिणाम आता कृषी क्षेत्रावर दिसू लागला असून ट्रॅक्टर मालकांनी शेतीच्या मशागतीच्या दरात तब्बल २५ टक्क्यांची मोठी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि मधल्या काळात झालेली इंधन टंचाई या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढवले आणि शेतकरी भाववाढीच्या अडचणीत सापडला. एकीकडे लांबलेला पाऊस आणि दुसरीकडे मशागतीचा वाढलेला खर्च अशा दुहेरी संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा होरपळून निघत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवाईलाच खते, बियाणे यांचा खर्च आणि आता मशागतीसाठीही जादा पैसे मोजावे लागत असल्याने ६० टक्के शेतकऱ्यांनी पावसाळा सुरू झाला तरी शेतीच्या मशागतीला सुरुवातच केलेली नाही. इंधनातील दर वाढीबरोबरच त्याला संभाव्य अल-निनोचे संकटही कारणीभूत आहे. बैलावरील शेती ही संकल्पनाच आता कालबाह्य होत असून शेतीकामात ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांचा वापर अनिवार्य झाला आहे. ९५ टक्के शेतीच्या मशागतीसाठी आज ट्रॅक्टरचा वापर होतो. डिझेलमधील दरवाढीमुळे यंदाच्या हंगामात ट्रॅक्टर मालकांनी नांगरणी, रोटव्हेटर आणि पेरणीच्या दरांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ज्या शेती मशागतीसाठी गतवर्षी दोन हजार रुपये मोजावे लागत होते, तिथे आता शेतकऱ्यांना अडीच हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. केलेली नाही. इंधनातील दर वाढीबरोबरच त्याला संभाव्य अल- निनोचे संकटही प्रकार दर वाढीपूर्वी दर वाढीनंतर नांगरणी १८०० २५०० रोटरणे १६०० २२०० पेरणी १२०० १५०० पेरणी १५०० १८०० Share with facebook डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे तरकारी वाहतुक करणाऱ्या वाहनचालकांनीही दरात सरासरी १५ टक्केपर्यंत वाढ केली आहे. ५० िकमीच्या अंतरासाठी फळभाजी वाहतुकीसाठी २० किलोच्या क्रेटला २५ रुपये भाडे घेतले जात होते, आता हा दर ३० ते ३५ रुपयावर पोहोचला आहे. कांदा गोणी वाहतुकीसाठी मागील दर ४० रुपये होता तो आता ५० रुपये झाला आहे. ^मागे शेतीसाठी बैलाचा वापर व्हायचा. शेतकऱ्याना बैल पाळणे परवडेना झाले आणि बैलावरील शेती संपली. आता ट्रॅक्टरशिवाय शेतीच होत नाही, त्यामुळे ट्रॅक्टर मालकांचे फावले आहे. कितीही दर वाढवले तरी सांगायचे कुणाला? आणि आमचे ऐकुण तरी कोण घेतोय? मोठया शेतकऱ्याकडे स्व:ताचे ट्रॅक्टर आहेत आमच्यासारख्या लहान शेतकऱ्यानी काय करायचे? तुकाराम डोंगरे , शेतकरी ^डिझेलच्या दरात मोठी वाढ तर झालीच आहे पण ट्रॅक्टरचा बिघाड झाला तर पार्ट आणि मजुरीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाईलाजाने मशागतीचे दरही वाढवावे लागले आहेत. नंागरणीमध्ये तर एकरामागे २०० रुपयेही रहात नाहीत. ड्रायव्हरचा पगार काढला तर खाली कांहीच शिल्लक रहात नाही. सज्जन चवरे , टॅक्टर मालक, पेनूर संकटही कारणीभूत आहे. यंदा मान्सून वेळेवर न आल्याने पावसाने दिलेली हुलकावणी आणि मशागतीचा वाढीव आर्थिक भुर्दंड यामुळे आधीच चिंतेत असलेला शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मशागतीच्या दरात २५ % वाढ डिझेलचे दर वाढलेच पण टँक्टर पार्टच्याही दरात झाली मोठी वाढ तरकारी वाहतुकीतही २० टक्के वाढ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *