![]()
औंढा नागनाथ तालुक्यातील एका गावात 21 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करून तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरुणावर औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 30 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील एक महिला तिच्या कुटुंबियांसह मागील एक वर्षापासून औंढा नागनाथ तालुक्यात कामाच्या निमित्ताने आली होती. शेतात काम करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु होता. सोमवारी ता. 29 दुपारच्या सुमारास महिला घरासमोर असतांना किरण पोले हा तेथे आला. त्याने त्या महिलेस तु मला फोन करत जा, “तू माझ्या सोबत जेव्हा बोलावल तेव्हा आली पाहिजे, तू माझ्या सोबत राहण्यास ये” असे म्हटले. मात्र त्याच्या बोलण्याकडे महिलेने दुर्लक्ष केली. त्यानंतर त्याने महिला कामावर जात असतांना तो पाठलाग करीत होता. “नवऱ्याला सोडून दे, नाहीतर…” यावेळी त्या महिलेने “तू माझा पाठलाग करू नको, मी तुझ्या सोबत येणार नाही, मला दोन मुले व नवरा आहे” असे सांगितले. त्यावर किरण पोले याने “तू तुझ्या नवऱ्याला सोडून दे, असे म्हणून तू जर माझ्यासोबत आली नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला व तुला जिवे मारून टाकतो” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने मंगळवारी ता. 30 थेट औंढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी किरण पोले याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राठोड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकाडे, जमादार रवीकांत हरकाळ पुढील तपास करीत आहेत.
Source link
तू माझ्या सोबत राहण्यास ये म्हणत विवाहितेचा पाठलाग करत विनयभंग:औंढा नागनाथ पोलिसात तरुणावर गुन्हा दाखल