Headlines

वृक्षारोपण हा केवळ कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प- पोलिस अधीक्षक:‘स्नेहबंध’आणि ‘दिव्य मराठी’च्या वतीने पोलिस अधीक्षक कार्यालयात वृक्षारोपण‎




“वृक्षारोपण हा केवळ एक दिवसाचा कार्यक्रम नसून तो पर्यावरण संवर्धनाचा सातत्यपूर्ण संकल्प आहे. आजच्या काळात वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे केवळ रोपण न करता संगोपन करणे गरजेचे आहे. असे केल्यास हरित आणि प्रदूषणमुक्त समाज घडविण्यास मोठी मदत होईल. सामाजिक संस्थांनी अशा उपक्रमांतून जनजागृती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘स्नेहबंध सोशल फाउंडेशन’ आणि ‘दिव्य मराठी’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक झाड एक जीवन’ अभियानांतर्गत येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात मंगळवारी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले. याप्रसंगी स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, पोलिस उपअधीक्षक (शहर) डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस उपअधीक्षक (ग्रामीण) शिरीष वमने, राखीव पोलिस निरीक्षक उमेश परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, पर्यावरणाचे रक्षण करणे ही केवळ सरकारची किंवा संस्थांची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे. स्नेहबंध फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. भविष्यातही विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने अधिकाधिक वृक्षारोपण करून ‘हरित अहिल्यानगर’च्या संकल्पनेला बळ देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *