Headlines

MP Dentist Banned 5 Years By AIDSA After Ketan Agrawal Murder Joke


पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याचा आरोप झालेल्या मध्य प्रदेशातील दंतवैद्य मुस्कान सोनी हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (AIDSA) ने मुस्कान सोनीला संघटने

.

केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणावर आक्षेपार्ह टिप्पणी करतानाचा मुस्कान सोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर तिच्यावर सर्व स्तरातून तीव्र टीका झाली होती. व्हिडिओमध्ये मुस्कान सोनी हिने केतन अग्रवाल यांचे ‘विग’वरून वादग्रस्त विधान केले होते. यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर AIDSA ने तिच्यावर पाच वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुस्कान सोनी हिने केतन अग्रवाल यांच्या हत्येची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावरही तिच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती.

माफी मागितली, पण कारवाई कायम

वाद वाढल्यानंतर मुस्कान सोनी हिने सार्वजनिकरित्या माफी मागितली. आपण केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत ती टिप्पणी चुकीची होती, असे तिने मान्य केले. मात्र, माफी मागूनही तिच्यावरील कारवाई मागे घेण्यात आलेली नाही. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशनने तिचे पाच वर्षांसाठी निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

AIDSA कडून निलंबनाचे आदेश

ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशनने (AIDSA) डॉ. मुस्कान सोनी यांना AIDSA च्या सर्व पदांवरून आणि सदस्यत्वावरून निलंबित केले आहे.

“डॉ. मुस्कान सोनी यांनी AIDSA च्या घटनेचे, आचारसंहितेचे आणि नैतिक मूल्यांचे उल्लंघन करून, गैरशिस्तीचे कृत्य केले असून दिवंगत केतन अग्रवाल यांच्याबद्दल अत्यंत अनुचित, आक्षेपार्ह आणि अनादरपूर्ण टिप्पणी केल्याचे आढळून आले आहे… सक्षम प्राधिकरणाने यात बदल किंवा रद्द करेपर्यंत, हे निलंबन जारी झाल्याच्या तारखेपासून पाच (05) वर्षांसाठी प्रभावी राहील. हा आदेश तात्काळ प्रभावाने अंमलात येत आहे,” असे निलंबन आदेशात म्हटले आहे.

या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांनी सार्वजनिक व्यासपीठावर जबाबदारीने वागण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

या संदर्भातील ही देखील बातमी वाचा..

लोहगडवरील हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा:14 जूनलाही झाला होता केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न! वडिलांचे गंभीर आरोप

लोहगड किल्ल्यावर २६ वर्षीय केतनला दरीत ढकलून त्याची हत्या केल्याप्रकरणी एक अत्यंत खळबळजनक आणि अंगावर काटा आणणारा खुलासा झाला आहे. केतनची हत्या १८ जून रोजी झाली असली, तरी त्यापूर्वी १४ जून रोजी देखील त्याची भावी पत्नी सिया गोयल हिने त्याला लोहगडवरूनच दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने एका झुडपामुळे केतन बचावला, तेव्हा सियाने ‘साप-साप’ असे ओरडत नाटक करत, केतनला मिठी मारून वेळ मारून नेली होती. हा धक्कादायक खुलासा खुद्द केतनच्या वडिलांनी केला असून, या कटात सियाचे कुटुंबीय देखील सामील असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.