![]()
कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत तब्बल 8 प्रवाशी ठार झाले असून, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. तर जखमीला लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, कल्याण – नगर मार्गावर सोमवारी सकाळी एक ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यात ईको कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्यामुळे त्यातील 8 प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. ते जागीच ठार झाले, तर त्यांच्यासोबतचा आणखी 1 जण या अपघातात गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ती माहिती महामार्ग पोलिस व स्थानिक टिटवाळा पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर सर्वांनी कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना व जखमींना बाहेर काढले. घटनास्थळी रक्तामांसाचा अक्षरशः सडा पडला होता. नेमकी कशी घडली घटना? प्राथमिक माहितीनुसार, कल्याण – अहिल्यानगर महामार्गावरील टिटवाळा व कल्याण लगतच्या रायता पुलावर हा अपघात घडला. अपघातग्रस्त ईको कार कल्याण ते मुरबाड अशी प्रवाशी वाहतूक करते. ती आज सकाळी प्रवाशी घेऊन कल्याणहून मुरबाडच्या दिशेने निघाली होती. अपघात घडला तेव्हा त्यात चालकासह 9 जण प्रवास करत होते. या कारला भरधाव वेगातील सिमेंट मिक्सर ट्रकने जोरदार धडक झाली. त्यात कारमधील एकाही व्यक्तीला बाहेर पडण्याची संधी मिळणार नाही. ट्रकच्या धडकेने कारमधील 8 जण जागीच ठार झाले, तर इतर 1 जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी लगतच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पोलिसांकडून मृत व जखमींची ओळख पटवण्याचा प्रयत्न या भीषण अपघातामधील मृत कुठले आहेत? त्यांची नावे काय आहेत? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या अपघातामुळे कल्याण – नगर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरुळीत झाली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर सर्वच मृतदेह पुढील सोपस्कारासाठी सरकारी रुग्णालयात पाठवलेत.
Source link
ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक:कारमधील 8 जण जागीच ठार, 1 गंभीर; कल्याण – नगर महामार्गावरील भयंकर घटना